दिं– २३ आॉक्टोबर – लोणीकंद पोलीस स्टेशन हद्दीत आरोपी हा पहाटेचे वेळी कॉलेज परीसरातील हॉस्टेलमध्ये प्रवेश करून विदयार्थीनी रुममध्ये चार्जिगला लावलेले किंवा ठेवलेले लॅपटॉप चोरीचे गुन्हे दाखल होते. सातत्याने घडणा-या अशा गुन्हयांच्या पध्दतीचा अभ्यास करून वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काईगंडे यांनी तपास पथकातील अधिकारी सपोनि गजानन जाधव व सपोनि रविंद्र गोडसे यांना लॅपटॉप चोरीचे गुन्हे उघडकीस आणणेकामी योग्य त्या सुचना देवून रायसोनी कॉलेज परिसरात पेट्रोलिंग करणेबाबत व सापळा लावुन कारवाई करणेबाबत सुचना दिल्या होत्या.
दिनांक १५/१०/२०२३ रोजी रायसोनी कॉलेज परिसरात पेट्रोलिंग करून सापळा लावुन थांबले असताना रायसोनी कॉलेज परिसरात लॅपटॉप चोरी करणारा चोरटा हा रायसोनी कॉलेजचे मुख्य गेट समोर उभा असुन त्याने अंगात फूल हाताचा निळया रंगाचा शर्ट काळया रंगाची पॅन्ट घातलेली आहे. सदरची बातमी पोलीस अंमलदार फरांदे यांनी तपास पथकाचे सपोनि गजानन जाधव यांना सांगितली असता त्यांनी पोलीस स्टाफच्या मदतीने रायसोनी कॉलेज समोरील मुख्य गेट समोर सापळा लावून निलेश प्रफुलचंद कर्नावट, वय ३९ वर्ष, रा. मु.पो. नांद्रा, ता. पाचोरा, जि. जळगाव यास ताब्यात घेतले.
तसेच लॅपटॉप चोरी केलेल्या घटनास्थळाच्या ठिकाणचे सीसीटिव्ही फुटेज चेक केले असता त्या मध्ये आरोपी एकच असल्याचे दिसत होते. त्याचे कसून चौकशी केली असता त्याने पुणे शहरातील रायसोनी कॉलेज, सिंहगड कॉलेज, सिम्बॉयस कॉलेज ,एमआयटी कॉलेज, वारजे माळवाडी, देहू वाडी, परिसरातून लॅपटॉप चोरीचे गुन्हे केल़े असल्याची कबुली दिली आहे.त्यामध्ये
एकूण २७ लॅपटॉप, १ टॅब व १ मोबाईल हॅण्डसेट असा एकुण १०,८०,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. गुन्हयाचा पुढील तपास पोलीस नाईक अजित फरांदे हे करीत आहोत. आरोपीकडे केलेल्या तपासात लोणीकंद पो स्टे.भारती विद्यापीठ, वारजे ,बिबवेवाडी, वानवडी, लोणी काळभोर व दिघी या पो.स्टे कडील गुन्हे उघडकीस आलेले आहेत.
सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग पुणे रंजनकुमार शर्मा पोलीस उपआयुक्त परिमंडळ ४. पुणे शशिकांत बोराटे सहा. पोलीस आयुक्त येरवडा विभाग, संजय पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काइगडे लोणीकंद पोलीस ठाणे, पुणे शहर पोलीस निरीक्षक (गुन्हे)
मारुती पाटील यांचे मार्गदर्शना खाली तपास पथकाचे सपोनि गजानन जाधव, रविंद्र गोड पाप बालासाहेब सकाटे, पोलीस हवालदार संदीप तिकोणे, पोलीस नाईक अजित फरांदे, सागर जगताप, विनायक साळवे, स्वप्नील जाधव, कैलास साळुंके, अमोल होणे, आशिष लोहार, पाडुरंग माने, मल्हारी सपुरे, साई रोकडे, दिपक कोकरे, शुभम चिनके, सचिन चव्हाण यांनी केली आहे.