पुणे – पंधरा वर्ष नगरसेवक, पाच वर्ष आमदारकी, राज्यात सत्ता असतानाही प्रभागातील माळवाडी येथील समस्यांच्या विळख्यात अडकलेल्या अमरधाम स्मशानभूमीला वाली नाही, साडेचारलाख लोकांच्या भावनेशी खेळ करणाऱ्या लोकप्रतिनिधी व पालिका प्रशासनाने सुधारणा केली नाही तर शिवसेना स्टाईलने आंदोलन छेडण्याचा इशारा उपशहरप्रमुख समीर तुपे यांनी दिला आहे.
नुकतीच माजी माजी नगरसेविकेच्या मुलाचा अंत्यविधी येथे झाला, मुसळधार पावसात हडपसर माळवाडी येथील स्मशानभूमी गळत होती, उभा रहायला जागा नव्हती, बसण्याचे बेंच तुटलेले होते, ही अवस्था बघता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपशहरप्रमुख यांनी पत्रकारांना घेऊन अमरधाम स्मशानभूमी मध्ये धाड टाकली अन दुरावस्था समोर आली, पिण्याच्या पाण्याचे नळ तुटलेले, पत्रे फाटलेले, शौचालय घाणेरडे, पाण्याची डबकी, शीतपेट्या नादुरुस्त पाण्याने भरलेल्या, ब्लॉक तुटलेले, साफसफाई नाही, कचऱ्याचे ढीग ही अवस्था पाहून त्यांनी संताप व्यक्त केला, मागील दफनभूमीजवळ कुंपण नाही, सुव्यवस्थित बाकडे त्यामुळे नशा करणाऱ्यांची चांगलीच चंगळ होत आहे, त्यामुळे गुन्हेगारीला प्रोत्साहन देण्याचे काम लोकप्रतिनिधी करत आहेत का? असं सवाल समीर तुपे यांनी दिला आहे.
हडपसर गाव, माळवाडी, साडेसतरा नळी, मगरपट्टा, ससाणेनगर, काळेपडळ, १५ नंबर, सातववाडी – गोंधळेनगर, चिंतामणीनगर, वैदूवाडी, शंकरमठ परिसरातील नागरिकांची हडपसर येथील एकच अमरधाम स्मशानभूमी आहे, या स्मशानभूमीमध्ये निधीची तरतूद नाही, समस्यांचे आगार झाले आहे, आमदार, प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे, येथील अवस्था पाहता नागरिकांशी कुचंबना होत असल्याने तातडीने कार्यवाही झाली नाही तर शिवसेनेच्या स्टाईलने आंदोलन करावे लागेल असं इशारा समीर तुपे यांनी दिला आहे.
विद्यमान आमदार चेतन तुपे यांच्या हक्काच्या मतदारसंघातील स्मशानभूमीची दुरावस्था झाल्याने अंत्यविधीला येणाऱ्या नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे, हडपसर जिवंत माणसांना जीवघेणे झालेले असताना अंत्यविधीप्रसंगी तरी सुविधा मिळणार का? असं सवाल समीर तुपे यांनी विचारला आहे.