पुणे – तक्रारदार यांनी त्यांच्या बांधलेल्या नविन घराचे कर आकारणी साठी माहे एप्रिल २०२४ मध्ये औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालयात अर्ज केला होता. सदरचा अर्ज पुढील कार्यवाहीसाठी लोकसेवक प्रशांत घाडगे यांचेकडे होता.
तक्रारदार हे त्यांचे वरील कामासाठी लोकसेवक प्रशांत घाडगे यांचेकडे पाठपुरावा करीत असताना लोकसेवक प्रशांत घाडगे यांनी तक्रारदार यांना त्यांचे अर्जा प्रमाणे नविन बांधलेल्या घराची कर आकारणी कमी करण्यासाठी तक्रारदार यांचेकडे २५,०००/- रुपये लाचेची मागणी केली व सदर बाब तक्रारदार यांनी लोकसेवक सुमित चांदेरे यांना सांगितली असता, त्यांनी तक्रारदार यांना लोकसेवक प्रशात घाडगे यांचे सांगण्याप्रमाणे २५,०००/- रुपयांची लाच द्यावी लागेल असे सांगितल्याने, तक्रारदार यांनी लोकसेवक क्र. १ सुमित चांदेरे व क्र. २ प्रशांत घाडगे यांनी तक्रारदार यांचेकडे २५,०००/- रुपयाची लाचेची मागणी केल्याची तक्रार तक्रारदार यांनी ला.प्र.वि. येथे दिली होती.
तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीची पडताळणी दिनांक दि.
पडताळणी दिनांक दि. १०/०६/२०२४ व दि. ११/०६/२०२४ रोजी
दोन वेळा पडताळणी पंचासमक्ष केली असता, आरोपी लोकसेवक १) सुमित राजेंद्र चांदेरे, वय २८ वर्ष, पद लिपीक टंकलेखक, (वर्ग-३)
२) प्रशांत शिवाजीराव घाडगे, वय ३४ वर्ष, पद (वर्ग-३) दोघे नेमणुक कर संकलन विभाग, औध कार्यालय, पुणे महानगरपालिका, लिपीक टंकलेखक, बाणेर क्षेत्रीय कार्यालय यांनी तक्रारदार यांचेकडे नविन बांधलेल्या घराची कर आकारणी कमी करण्यासाठी व बिल कमी करुन सवलत देण्याबाबत पंचासमक्ष तडजोडीअंती २५,०००/- रुपयांची लाच मागणी करुन, लोकसेवक क्र. १ सुमित चांदेरे यांनी तक्रारदार यांचेकडून रुपये २५,०००/- लाच रक्कम स्विकारल्यावर
दिनांक ११/०६/२०२४ रोजी सायंकाळी ४;०० वाजता आँध बाणेर क्षेत्रीय कार्यालयाचे पाकींगमध्ये, दोघांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांचेविरुद्ध चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन, पुणे शहर येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, सन १९८८ चे कलम ७, ७ अ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास लाच लुचपत प्रतिबंधक विभाग
पुणे चे पोलीस निरीक्षक अतुल भोसले करीत आहेत.
सदरची कारवाई मा. पोलीस उप आयुक्त/पोलीस अधीक्षक अमोल तांबे, ला.प्र.वि. पुणे परिक्षेत्र, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे, ला.प्र.वि. पुणे यांचे मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली
लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास त्याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे कार्यालयास खालील नमूद क्रमांकवर सपंर्क साधण्याचे आवाहन श्री. अमोल तांबे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. पुणे यांनी केले आहे.