लोणी काळभोर – दिनांक 10/08/2024 रोजी गुन्हे शाखा युनिट-6 कडील पोलीस अधिकारी व अंमलदार असे युनिट हद्दीत गुन्हे प्रतिबंधक गस्त करीत असताना “पोलीस नाईक 7317 नितीन मुंढे” यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, एक इसम कवडीपाट टोलनाका लोणीकाळभोर येथे येणार असुन त्याचेकडे चोरीची गाडी आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदर माहिती पोलीस निरीक्षक प्रताप पोमण यांना कळवून त्यांनी स्टाफसह माहितीप्रमाणे जावून खात्री करुन कारवाई करणेबाबत आदेशित केल्याने सदर ठिकाणी जावून सापळा रचून एका इसमास दुचाकीसह ताब्यात घेऊन नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव सागर बाबुराव वाघमारे, वय २७ वर्षे, रा.मु.पो. तांदुळवाडी, ता. माळशिरस, जि. सोलापुर असे सांगितले. त्याचे ताब्यातील दुचाकीबाबत चौकशी करुन अभिलेख तपासले असता सदरबाबत जेजुरी पो.स्टे.गु.र.नं. 294/2023 भा दं वि क 379 प्रमाणे गुन्हा नोंद असलेबाबत समजले. त्याचेकडून गुन्ह्यातील एकूण 30,000 रू कि ची मो सा तपासकामी जप्त करण्यात आली आहे. त्यांची वैद्यकिय तपासणी करुन पुढील तपासकामी जेजुरी पोलीस स्टेशन यांचे स्वाधीन करण्यात आले आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस उपआयुक्त गुन्हे, अमोल झेंडे, मा. सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे – २ सतीश गोवेकर यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, युनिट – ६ चे पोलीस निरीक्षक प्रताप पोमण, रमेश मेमाणे, कानिफनाथ कारखेले, नितीन मुंढे, समीर पिलाने, ऋषिकेश व्यवहारे, ऋषीकेश ताकवणे, सचिन पवार, शेखर काटे, नितीन धाडगे, बाळासाहेब तनपुरे, गणेश डोंगरे, किर्ती मांदळे, प्रतिक्षा पानसरे व सुहास तांबेकर यांनी केली आहे.