पुणे – लाच प्रकरणी तक्रारदार यांचे वडीलोपार्जीत शेतजमीनीचा ऑनलाईन सात-बारा उता-यावर त्यांचे नाव दिसत नसल्याने त्यांचे ऑनलाईन नाव दिसणेकरीता वासुली तलाठी कार्यालय येथील तलाठी लोकसेवक सतिश पवार यांची भेट घेतली असता, लोकसेवक सतिश पवार यांनी तक्रारदार यांचेकडे ३०,०००/- रुपयांची लाचेची मागणी केल्याची तक्रार तक्रारदार यांनी ला.प्र.वि. येथे दिली होती.
सदर तक्रारीची पडताळणी दि. १७/०५/२०२४ पंचासमक्ष केली असता, लोकसेवक सतिश संपतराव पवार, वय ५२ वर्ष, पद तलाठी (वर्ग-३), सजा वासुली, ता. खेड, जिल्हा पुणे. यांनी तक्रारदार यांचेकडे वडीलोपार्जीत शेतजमीनीचा ऑनलाईन सात-बारा उता-यावर त्यांचे नाव दिसण्यासाठी पंचासमक्ष तडजोडीअंती २०,०००/- रुपयांची लाचेच्या रक्कमेची मागणी करुन, दि. १०/०६/२०२४ रोजी लोकसेवक सतिश पवार यांनी तक्रारदार यांचेकडून रुपये २०,०००/- रुपये लाच रक्कम पंचासमक्ष स्विकारल्यावर त्याना दिनांक १०/०६/२०२४ रोजी वासुली गांव येथील तलाठी कार्यालय, ता. खेड, जि. पुणे. येथुन अटक करण्यात आली असून, त्यांचेविरुद्ध म्हाळुंगे पोलीस स्टेशन, पिंपरी चिंचवड येथे गु.र.नं ३७०/२०२४, भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, सन १९८८ चे कलम ७ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ला.प्र.वि. पुणे येथील पोलीस निरीक्षक प्रविण निंबाळकर पुढील तपारा करीत आहेत.
सदरची कारवाई पोलीस उप आयुक्त/पोलीस अधीक्षक अमोल तांबे, ला.प्र.वि. पुणे परिक्षेत्र, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे, ला.प्र.वि. पुणे यांचे मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली.
लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास त्याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पूर्ण कार्यालयास खालील नमूद क्रमांकवर सपंर्क साधण्याचे आवाहन श्री. अमोल तांबे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. पुणे यांनी केले आहे.