पुणे -दिं-१७ जून– महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग चार-ब असाधारण क्रमांक ३१३, गृहविभाग दि.०६/०९/२०१९ अन्वयेच्या आदेशानुसार सन २०२२-२०२३ ची पोलीस भरती अपर पोलीस महासंचालक, प्रशिक्षण व खास पथके, म.रा. मुंबई यांचेकडील क्र. प्रशि/पोशि. भरती-प्रक्रिया २०२१/१८८/२०२१/२७८, दि.२८/०२/२०२४ नुसार दि.०१/०३/२०२४ रोजीच्या वर्तमान पत्रात पोलीस शिपाई-५० पदे व पोलीस शिपाई चालक-१८ पदे अशी एकूण ६८ पदाची पोलीस भरती पुणे लोहमार्ग येथे करणेबाबत जाहिरात देण्यात आलेली होती.
सदर पदांची पोलीस भरती ही सामाजिक प्रवर्गनिहाय आरक्षणानुसार व नियमानुसार करण्याबाबत जाहिरातीमध्ये नमूद केलेले होते. पोलीस भरतीसाठी पुणे लोहमार्ग येथे ३१८२ आवेदन अर्ज प्राप्त झालेले आहेत. त्याअनुषंगाने दि.१९/०६/२०२४ ते दि.२३/०६/२०२४ रोजी पर्यंत शैक्षणिक कागदपत्र पडताळणी / शारिरीक मोजमाप चाचणी व मैदानी चाचणीसाठी अॅम्युनिशन फॅक्टरी (गोळा बारुद निर्माणी) ऑडीनन्स इस्टेट, क्रिकेट ग्राऊंड एम्प्लाईज हॉस्टेल समोर, खडकी, पुणे या ठिकाणी यापूर्वी दिलेल्या वेळापत्रकानुसार करण्यात येणार आहे. सध्या पावसाचे दिवस आहेत. म्हणून शारीरिक चाचणी घेताना मैदानाची आखणी अशा प्रकारे करण्यात आलेली आहे की शक्यतो पावसाचा व्यत्यय मैदानी चाचणीत येणार नाही.
जर पावसामुळे एखादे दिवशी मैदानी चाचणी होऊ शकली नाही, तर त्यांना सुयोग्य तारीख दिली जाईल. काही उमेदवारांना वेगवेगळ्या पदांकरिता एका पेक्षा जास्त ठिकाणी आणि एकाच दिवशी मैदानी चाचणी करिता सूचना प्राप्त झाली असेल अशा उमेदवारांना दुसरी तारीख दिली जाईल. शारिरिक मैदानी चाचणीच्या अनुषंगाने झालेल्या बदलाबाबत या कार्यालयाचे https://punerailwaypolice.gov.in या संकेतस्थळावर वेळोवेळी कळविले जाईल. तसेच काही उमेदवारांना इतर अडचणी असल्यास त्याचे निरसन स्थानिक पातळीवर केलेजाईल.
( तुषार दोशी) भा.पो.से पोलीस अधीक्षक, लोहमार्ग, पुणे