मुंबई – नागपाडा पोलीस ठाणे, मुंबई चे हद्दीमध्ये मोबाईल मिसिंग तसेच मोबाईल चोरी झालेबाबत पोलीस ठाणेस तकारी प्राप्त झाल्या होत्या. सदर तकारीच्या अनुशंगाने तकारी नोंद करून त्यांचे मोबाईल चे आय.एम.ई.आय. प्राप्त करून ते CEIR या पोर्टलवरती मोबाईल ट्रेसिंगसाठी ठेवून त्यांचा तांत्रिक तपास करून सदरचे मोबाईल हे मोबाईल मिसिंग शोध पथकाचे म. पो.उपनि. धोत्रे, पो.उपनि. कदम, पोशिक. ०९०३८५/बोरसे, पोशिक. ०७०४२१/बुगले, पोशिक, डोंगेर, पोशिक. ०९१७५३/पवार, म.पो.शि बारेला या पथकाने तसेच गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सपोनि. काळे, पो.उपनि. खैरावकर व पथक यांनी नागपाडा पोलीस ठाणे, मुंबई नोंद हरवलेल्या मोबाईलचा CEIR या पोर्टलच्या आधारे प्राप्त झालेल्या माहितीच्या अनुशंगाने निरंतर पाठपुरावा करून सदर मोबाईलचे वापरकर्ते यांचा शोध घेवून मुंबई, महाराष्ट्र तसेच गुजरात, उत्तर प्रदेश, झारखंड, बिहार, दिल्ली, राजस्थान, पंजाब, पश्चिम बंगाल या परराज्यातून एकूण ७,९५,०००/- रूपये किंमतीचे एकूण ५३ मोबाईल वेगवेगळ्या राज्यातून हस्तगत करून आज दिनांक १५/०६/२०२४ रोजी नागपाडा पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, महेशकुमार ठाकूर, पोलीस निरीक्षक संजय निंबाळकर (प्रशासन), पोलीस निरीक्षक सोमेश्वर खाटपे (जनसंपर्क), पोलीस निरीक्षक संतोष खांडेकर (गुन्हे) तसेच नागपाडा पोलीस ठाणेचे अधिकारी व अंमलदार यांच्या हस्ते तकारदार यांना परत केले आहेत. अशी वरील पथकाने उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे.
सदरची कामगीरी ही अनिल पारसकर, अपर पोलीस आयुक्त, मध्य प्रादेशीक विभाग, मुंबई, कृष्ण कांत उपाध्याय, पोलीस उप आयुक्त परिमंडळ ०३ मुंबई,. शोभा पिसे, सहायक पोलीस आयुक्त, ताडदेव विभाग, मुंबई, महेशकुमार ठाकुर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, नागपाडा पोलीस ठाणे, मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली नागपाडा पोलीस ठाणेचे संतोष खांडेकर, पोलीस निरीक्षक, गुन्हे, सहायक पोलीस निरीक्षक- सोमनाथ काळे, पोलीस उप निरीक्षक- योगेश खैरावकर, म.पो.उ.नि. सविता धोत्रे व मोबाईल मिसिंग पथक तसेच गुन्हे प्रकटीकरण पथक यांनी केली आहे.