लोणी काळभोर : पुणे सोलापूर महामार्गावर दिवसेंदिवस अपघातांचे प्रमाण वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे लोणी काळभोर या ठिकाणी मराठी पत्रकार परिषद संलग्न पुणे जिल्हा पत्रकार संघ आणि हवेली तालुका पत्रकार संघाचे पदाधिकारी व पत्रकार यांनी एकत्र येऊन वाढत्या अपघाताला आमंत्रण देणारे महामार्गावरील खड्यांचे आज हार घालून नारळ फोडून , अगरबत्ती लावून पूजन केले आंदोलन करताना पुणे जिल्हा पत्रकार संघ उपाध्यक्ष रमेश निकाळजे,हवेली तालुका पत्रकार संघ अध्यक्ष स्वप्नील कदम,हवेली तालुका संघटक सनी फलटणकर, रामदास आण्णा पवार, फकीर इनामदार,संजय आवारे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते . व निष्क्रिय प्रशासन आणि बेजबाबदार अधिकाऱ्यांचा निषेध व्यक्त केला आहे.
रमेश निकाळजे, उपाध्यक्ष -पुणे जिल्हा पत्रकार संघ
पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग हा निष्क्रिय अधिकाऱ्यांमुळे मृत्यूचा सापळा झाला आहे. झोपलेल्या प्रशासनाला जागे करण्यासाठी आम्हाला रस्त्यावर उतरून हे आंदोलन करावे लागते ही अतिशय दुःखाची बाब आहे.
स्वप्नील कदम, अध्यक्ष – तालुका हवेली पत्रकार संघ.
लोणी स्टेशन या ठिकाणी काही महिन्यांपूर्वी शाळेत जाणाऱ्या दोन विद्यार्थ्यांनींचा खड्यांमुळे अपघाती मृत्यू झाला होता. स्थानिक आमदार खासदार यांना कधी जाग येणार..?