पुणे- महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पुणे लोकसभा समन्वयक श्रीनाथ भिमाले यांनी पर्वती विधानसभा मतदारसंघांमध्ये आयोजित “महाआरोग्य शिबीर व मोफत चष्मे वाटप” उपक्रम पर्वती विधानसभा मतदारसंघातील विविध ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे.
शिबीर ठिकाणे पुढीलप्रमाणे 1) सिरवी बंधू आई माता चौक, मार्केटयार्ड 2)अप्पर इंदिरा नगर संविधान चौक, बिबवेवाडी 3)गजानन महाराज चौक, पर्वती 4)ई-लर्निंग स्कूल ,पर्वती दर्शन 5)दांडेकर पूल,चौक 6)जनता वसाहत सांस्कृतीक भवन 7)पुष्प मंगल कार्यालय, बिबवेवाडी कॉर्नर येथे सोमवार दि.२२ जुलै २०२४ रोजी सकाळी ०९.३० वाजेपासून दिवसभर सुरू राहणाऱ्या या महाआरोग्य शिबिराचा लाभ परिसरातील सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मा.श्री.श्रीनाथ भिमाले यांनी नागरिकांना केले आहे.