पुणे -महागाई, बेरोजगारी, व विविध समस्यांनी महाराष्ट्र ग्रस्त असून, शासनाच्या योजना लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी पगारी युवक कामाला लावले जाणार आहेत, फसवे सरकार हद्दपार करून महाविकास आघाडी सरकार राज्यात आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आयोजित शिवस्वराज्य यात्रेचे आगमन मांजरी व हडपसर येथे झाले. ढोल ताशाच्या गजरात, जेसीबीने फुले उधळून मोठ्या जल्लोषात यात्रेचे स्वागत करण्यात आले.
याप्रसंगी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार डॉ.अमोल कोल्हे, प्रदेश युवक अध्यक्ष मेहबूब शेख, आमदार अशोक पवार, जिल्हाध्यक्ष जग्गनाथ शेवाळे, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, अल्पसंख्यांक प्रदेशाध्यक्ष पंडित कांबळे, उद्योग प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे, अंकुश काकडे, माजी उपमहापौर बंडू तात्या गायकवाड, निलेश मगर, माजी नगरसेवक योगेश ससाणे, रत्नप्रभा जगताप, भारती शेवाळे, हडपसर अध्यक्ष प्रविण तुपे, महिला अध्यक्षा वंदना मोडक, कार्याध्यक्षा सविता मोरे, रुपाली शिंदे, किरण गाडेकर, विक्रम जाधव, आदी उपस्थित होते.
लाडकी बहीण योजना ही फसवी योजना फक्त निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन आणली आहे, योजनांची जाहिरात म्हणजे सरकार अपयशी ठरल्याची कबुली आहे, महायुतीच्या भुलथापांना बळी न पडता लोकसभा निवडणुकीची पुनरावृत्ती विधानसभा निवडणुकीत करावी असे आवाहन करून महायुतीच्या भ्रष्ट कारभाराचे खा. डॉ. अमोल कोल्हे यांनी काढले.
भाजप ना खाऊंगा ना खाने दूंगा म्हणाले अन सर्व भ्रष्टाचारी सोबत घेतले, युवकांच्या भविष्याचा विचार करणारे शिवस्वराज्य निर्माण व्हावे म्हणून यात्रा काढली. गुलाबी कलर आणला म्हणून सत्ता येणार नाही, बारामती मध्ये पैशाचा पाऊस पाडला, पण जनता पवार साहेबांच्या सोबत राहिले, जनता या भ्रष्ट लोकांना घरी बसविणार या शब्दांत अजित पवार यांच्यावर युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी टिका केली.
शरद पवार यांना सोडून जाणाऱ्याला पाच वर्ष आमदारकीचे संधी मिळूनही हडपसर परिसरातील प्रश्न न सोडविता आले नाहीत, अपयशी ठरलेल्या आमदारास मतदारांनी घरी बसवावे असे आवाहन शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी यावेळी केले.
यावेळी विविध पक्षातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात युवकांचे प्रवेश झाले.शैलेश बेल्हेकर यांनी सूत्रसंचालन केले.
प्रशांत जगताप यांना विधानसभा उमेदवारीचे संकेत…
शिवस्वराज्य यात्रेनिमित आयोजित सभेत कार्यकर्ते प्रशांत जगताप यांच्या घोषणा देत होते, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी याचा धागा पकडून शहराध्यक्ष म्हणून चांगली कामगिरी केली आहे, तुमच्या मनातील, काम करणारा माणूस आम्ही हडपसर मधून उमेदवार देणार असे जाहीर करून प्रशांत जगताप यांच्या उमेदवारीचे जाहीर संकेत दिले.