पुणे -आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्शवभूमीवर शहरातील चौका चौकात भावी आमदारांचे फ्लेक्स तर सोशल मीडिया वर भीमालेचे मी लढणार व जिंकणार लिहिलेले फ्लेक्स शहरात झळकल्यामुळे भावी आमदार व विद्यमान आमदार यांच्यामधील तिकिटाची स्पर्धा तीव्र होताना दिसत आहे. आताच लोकसभेची निवडणुक पुणे शहरातून भाजपा ने जिंकली.
पर्वती मतदार संघातून भाजपाचे नेते श्रीनाथ भीमाले यांनी भाजपा लोकसभा समन्व्यक पदाची महत्वाची जबाबदारी पुणे शहरातून सांभाळली श्रीनाथ भीमाले यांनी पुणे मनपा मध्ये सभागृह नेते असताना पुणे शहरातील नागरिकांची मोठ्याप्रमाणात विकासकामे केल्याने ते पुणेकरांच्या हक्काचे नेतेही त्यांना बोलले जाते.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना व मतदार नोंदणी अभियान राबविण्याचे काम पर्वती मतदार संघात भीमाले यांच्यावतीने जोमात सुरु आहे या अभियानास मोठा प्रतिसादही मिळत आहे.
स्थानिक नागरिकांमध्ये भीमालेची वाढती लोकप्रियता व भीमाले साहेबांनी आमदार व्हावे अशी नागरिकांकडून इच्छा व्यक्त होताना दिसत असल्यामुळे विद्यमान आमदार यांच्यामध्ये अस्वस्थता पाहायला मिळत आहे. भाजप चे नेते श्रीनाथ भीमाले हे वीस वर्षाहून अधिक काळ भाजपचे विश्वासू पदाधिकारी म्हणून बोलले जाते पण यंदा पर्वती मतदार संघात आमदार तिकिटा वर कोण बाजी मारणार हे येणाऱ्या काळात पाहायला मिळणार आहे.