यवत – यवत येथील गणपती मंडळाच्या मागील बाजूस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार “गर्दूल्यांचा झुगाराचा डाव“राजरोसपणे सुरु आहे. याची तक्रार काही सामाजिक कार्यकर्त्यांनी ११२ क्रमांकावर आपल्या भ्रमणध्वनीवरून पोलिसांना कळविली परंतू स्थानिक पोलीस अवघ्या हाकेच्या अंतरावर पोलीस स्टेशन असुन देखील अर्ध्या तासाने पोचले. तसेच पोलीस येण्याआधीच सदरील मंडळीना खबरी आल्यामुळे त्यांना तेथून पळ काढण्यासाठी हातची संधी मिळाली.
त्यानंतर सामाजिक तक्रारकर्ते पोलीस येत नाहीत म्हणून वाट पाहून शेवटी स्वतः अर्ध्या तासानंतर पोलीस स्टेशनंला गेले. व तेथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या कानावर तो प्रकार सांगितला, त्यानंतर त्यांनी त्यांचे कर्मचारी सामाजिक कार्यकर्ताबरोबर कारवाईसाठी दिले. परंतू कारवाईसाठी पोलीस उशिरा आल्यामुळे नेहमीप्रमाणे त्यांच्या हाती काहीच लागले नाही. परंतू त्याठिकाणी झुगार खेळण्यासाठी जो अडोसा केला होता त्याठिकाणी अडोसा म्हणून एका शासकीय योजनेचा ज्यावर भारतीय राजमुद्रा छापलेली होती. हे जेव्हा सामाजिक कार्यकर्त्यांनी हा गंभीर प्रकार स्थानिक पोलीसांच्या निदर्शनास आणून दिला. त्यानंतर पोलीसांनी तात्काळ तो राजमुद्रा असलेला बॅनर जप्त करून पोलीस स्टेशनला घेऊन गेले.
यासंदर्भात सामाजिक कार्यकर्त्यांनी दोन-तीन दिवस काय कारवाई झाली याचा पाठपुरावा केला असता यवत पोलीसांकडून कसलाही प्रतिसाद मिळाला नाही. याच्यामागील नेमकं गौडबंगाल तरी काय अशी उलट -सुलट चर्चा नागरिकांमध्ये सुरु आहे.