पुणे – यातील तक्रारदार हे शेतकरी असून, त्यांचे शेतजमीनीच्या सातबारा उता-यावर असलेली गिनी गवताची नोंद कमी करून, तसा दुरुस्त सातबारा उतारा देण्यासाठी लोकसेवक अंकुश साठे यांनी तक्रारदार यांचेकडे १०,०००/- रुपयांची लाचेची मागणी केल्याची तक्रार तक्रारदार यांनी ला.प्र.वि. येथे दिली होती.
तक्रारदार यांच्या तक्रारीची पडताळणी दिनांक दि. १९/०६/२०२४ व दि. २५/०६/२०२४ रोजी पंचासमक्ष केली असता, लोकसेवक अंकुश रामचंद्र साठे, यथ ४३ वर्ष, पद तलाठी, सजा खांडशी, ता. मावळ, जि. पुणे (वर्ग-३) यांनी तक्रारदार यांचेकडे वरील काम करुन देण्यासाठी तडजोडीअंती १०,०००/- रुपयांची लाच मागणी करुन, लोकसेवक अंकुश साठे यांनी तक्रारदार यांचेकडून रुपये १०,०००/- लाच रक्कम पंचासमक्ष स्विकारल्यावर त्याना दिनांक २५/०६/२०२४ रोजी कार्ला मंडल कार्यालय ता. मावळ, जि. पुणे येथून ताब्यात घेण्यात आले असून, त्यांचेविरुद्ध लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण येथे गु.र.नं. २१३/२०२४ भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, सन १९८८ चे कलम ७. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर घटनेचा पुढील तपास ला.प्र.वि. पुणे येथील पोलीस निरीक्षक प्रविण निंबाळकर करीत आहेत.
सदरची कारवाई पोलीस उप आयुक्त/पोलीस अधीक्षक अमोल तांबे, ला.प्र.वि. पुणे परिक्षेत्र, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे, ला.प्र.वि. पुणे यांचे मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली.