लोणी काळभोर – पंचायत समिती हवेलीचे मा.उपसभापती सनी उर्फ युगंधर काळभोर हे कायम सामाजिक कामामुळे चर्चेत असतात.पंचायत समिती उपसभापती पदी असताना काळभोर यांनी हवेली तालुक्यातील शेतकऱ्यांना जन सामान्य नागरिकांना पंचायत समितीच्या विविध योजना राबवून अनेक योजनाचा लाभ नागरिकांना घेऊन दिला त्यामुळे नागरिक व शेतकरी यांच्यामनात एक आपुलकीचे स्थान त्यांनी मिळवले .उपसभापती सनी उर्फ युगंधर काळभोर यांना लोकप्रिय व सामाजिक कामातून सर्वाना मदत करणारा नेता असेही बोलले जाते.यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कुंजीरवाडी येथील ज्ञानेश्वर सावंत यांनी ग्रामीण सर्वोदय संघ संचलित प्राथमिक शाळेमधील गरीब विद्यार्थ्यांना त्यांनी स्वखर्चाने गणवेश वाटप केले.
विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करून सामाजिक बांधिलकी जोपासली त्यामुळे संपूर्ण हवेली तालुक्यात त्यांच्या उपक्रमाचे चांगलेच कौतुक होत आहे.
या कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे कार्याध्यक्ष अरुण आप्पा घुले,ग्रामपंचायत सदस्य नागेश काळभोर,ज्ञानेश्वर उर्फ माऊली सावंत,या शाळेतील मुख्याध्यापक,शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.