पुणे – यातील तक्रारदार यांनी महाराष्ट्र राज्य स्तरीय योजना दुधाळ गाई / म्हशीचे वाटप करणे या योजनेचा लाभ मिळणेकरीता ऑनलाईन अर्ज सादर केला होता. लोकसेवक बंडू देवकर यांनी तक्रारदार यांना नमूद योजनेच्या अंतिम यादीमध्ये लाभार्थी म्हणून नाव घालून देतो. त्याकरीता लोकसेवक बंडू देवकर यानी तक्रारदार यांचेकडे ७,०००/- रुपयाची लाचेची मागणी केल्याची तक्रार तक्रारदार यांनी ला.प्र.वि. पुणे कडे दिली होती. सदर तक्रारदार यांच्या तक्रारीची पडताळणी पंचासमक्ष केली असता, लोकसेवक बंडू देवकर वय ४३ वर्ष, पद पशुधन पर्यवेक्षक, कुडे बुद्रुक ता. खेड, जि. पुणे. (वर्ग-३) यानी वरील काम करुन देण्यासाठी पडताळणी दि. ३१/०७/२०२४, दि.०१/०८/२०२४ व दि. ०५/०८/२०२४ रोजी.पंचासमक्ष रक्कम रुपये ७,०००/- पैकी तडजोडीअंती ५,०००/- रुपयांची लाच मागणी करुन, लोकसेवक बंडू देवकर यांनी तक्रारदार यांचेकडून रुपये ५,०००/- लाच रक्कम पंचासमक्ष स्विकारले असता सापळा लावून दि. ०६/०८/२०२४ रोजी १३.२० वा. चे सुमारास पशु वैद्यकीय रुग्णालय, कुडे बुद्रुक, ता. खेड, जि. पुणे.येथील कार्यालयात रंगेहाथ पकडण्यात आले असून, त्यांचेविरुद्ध खेड पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, सन १९८८ चे कलमान्वये.गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.
ला.प्र.वि. पुणे येथील पोलीस निरीक्षक रुपेश जाधव तपास करत आहेत. सदरची कारवाई मा. पोलीस उप आयुक्त/पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे, ला.प्र.वि. पुणे परिक्षेत्र, मा. अपर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे, ला.प्र.वि. पुणे यांचे मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली.