मुंढवा – हडपसर विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार गंगाधर बधे यांची मुंढवा व मांजरी परिसरात रॅलीच्या माध्यमातून विधानसभेची तयारी मोठ्या जोमाने सुरु आहे.
आज बधे यांची बीटी कवडे रोड,पिंगळे वस्ती,मुंढवा,ससाणे नगर , सय्यद नगर परिसरात मोठी जनसंवाद रॅली काढण्यात आली या रॅलीमध्ये तरुणांनाचा वाढता प्रतिसाद पाहून सगळीकडे गंगाधर बधे यांच्या नावाच्या चर्चेला उधाण आले आहे
प्रचार रॅली दरम्यान बधे सर्व सामान्य नागरिकांच्या स्वतः भेट घेऊन नागरिकांच्या समस्याही जाणून घेत असल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे
विधानसभा निवडणुक जिंकल्यानंतर तुमच्या सर्व विकासकामाची जबाबदारी माझी आहे आणि मला एक संधी द्या मी हडपसर विधानसभा मतदारसंघात मोठा विकासाचा कायापालट केल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास अपक्ष उमेदवार गंगाधर बधे यांनी नागरिकांना दर्शवीला.