लोणी काळभोर – रविवार दिनांक 23 फेब्रुवारी 2025 रोजी लोणी काळभोर येथील नेहाज अकॅडमी या कला शिक्षण संस्थेचा पंचवार्षिक वर्धापन दिन सोहळा हॉटेल ग्रँड 11 येथे अगदी उत्साहात संपन्न झाला. या अकॅडमीत पेटी…तबला.. पखवाज…गायन…वादन.. भरतनाट्यम नृत्य.. चीत्रकला..असे विविध वर्ग घेतले जातात.तसेच गणेश उत्सवात शाडू .मातीपासून गणेश मूर्ती कार्य शाळा चे आयोजन करून पर्यावरण जपण्याचा संदेश दिला जातो.मुलांना शिक्षणा सोबत आपल्या भारतीय शास्त्रीय विषयांचे ही ज्ञान असावे हा आमचा उद्देश आहे. कार्यक्रमास प्रमूख अतिथी म्हणून रेम्बो स्कूल चे संस्थापक श्री नितीन काळभोर व मंत्र गुरुकुल म चे संस्थपक श्री कासार सर…देव गंधार म्युझिक अकॅडमी चे श्री आकाश तुपे सर व महावीर मतिमंद निवासी विद्यालय मुख्याध्यापिका सौ अर्चना मॅडम उपस्थित होते.
अतिशय उत्कृष्ट दर्जाचे शास्त्रीय संगीत तसेच भरतनाट्यम नृत्याचा आविष्कार विद्यार्थ्यांकडून सादर करण्यात आला.आपल्या संस्कृतीचा वारसा म्हणजे शास्त्रीय संगीत तसेच शास्त्रीय नृत्य जपण्याचे काम ही संस्था करत आहे त्याबद्दल संस्थेचे अभिनंदन आणि कौतुक या कार्यक्रमासाठी पालकांनीही उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. अकॅडमी चे संगीत शिक्षक सौ रेखा सरोदे तबला शिक्षक श्री पालखे सर नृत्य गुरु तेजश्री ताई वडके यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले…सूत्रसंचालन सौ पूनम ताई भोसले यांनी केले