पुणे हवेली : पुणे सोलापूर महामार्गांवर कदमवाकवस्ती येथुन नॅशनल हायवे महामार्गावर वाहतूक कोंडीचा वाहन चालकांना त्रास सहन करावा लागला.
लोणी काळभोर वाहतूक शाखेने कदमवाकवाकवस्ती टोल नाका या ठिकाणी जड वाहने थांबण्यासाठी गेली दोन महिने जड वाहनांना सायंकाळी ६:०० ते रात्री ११:०० वाजेपर्यंत शहरात जाण्यासाठी मज्जाव करण्यात आला असल्याचे हजर असलेल्या वाहतूक कर्मचारी यांनी सांगितले. वरिष्ठांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात येत असल्याचे सांगितले.
वाहतूक शाखेच्या या कारवाईने पुणे सोलापूर महामार्गांवर नित्यनियमाने शहरात जाणाऱ्या व सोलापूर च्या दिशेने जाणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना वाहतुक कोंडीचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. स्थानिक गावकऱ्यांना व प्रवासी नागरिकांना मोठ्याप्रमाणावर वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे
लोणी काळभोर वाहतूक शाखेला सक्षम अधिकार्याची गरज..
लोणी काळभोर पुणे सोलापूर महामार्गांवर (दि. १९) रोजी सायंकाळी जवळपास अंदाजे तीन ते चार किलोमीटर दुतर्फा वाहतूक कोंडी झाली या वाहतूक कोंडीत रुग्णवाहीका अडकली यावेळी संबधित वाहतूक शाखेचे पोलीस अधिकारी यांना संपर्क साधला असता. सहाय्य्क पोलीस निरीक्षक देवेंद्र पवार यांनी फोन न उचलने हेच सोईस्कर पद्धतीने ठरवले. अशा वेळी जर जबाबदार पोलीस अधिकारी फोन उचलत नसतील तर लोणी काळभोर वाहतूक शाखेला एका जबाबदार सक्षम अधिकार्याची गरज असल्याचे स्थानिक नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आले आहे.
तसेच संबंधित अधिकारी फोन उचलत नसल्याने संजय सुर्वे, सहायक पोलीस आयुक्त, वाहतूक शाखा संपर्क साधला असता खालील प्रमाणे प्रतिक्रिया दिली.
सहायक पोलीस निरीक्षक देवेंद्र पवार लोणी काळभोर वाहतूक शाखा
या घटनेची माहिती घेण्यासाठी स्थानिक वार्ताहर फोन करत असताना संबंधित पोलीस अधिकारी देवेंद्र पवार लोणी काळभोर वाहतूक शाखा यांची कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया मिळाली नाही.
संजय सुर्वे, सहायक पोलीस आयुक्त, वाहतूक शाखा
माझे तेथील अधिकारी यांचे बोलणे झाले आहे. शहरात दिवसा जड वाहनास बंदी आहे. ते कायदेशीर आहे. पोलीस कमिशनर यांची हद्द असल्याने जड वाहनास रात्री १० वाजेपर्यंत शहरात बंदी आहे. पर्यायी मार्ग असताना वाहने सरळ येतात कारण पर्यायी मार्गावर जड वाहने वळत नाहीत असे निदर्शनास आले आहे. तरीही दुसरा पर्यायी मार्ग काढण्याचे संबंधित अधिकारी यांना सुचना देण्यात येतील. दिवसा संबंधित अधिकारी सर्वे करतील त्यानुसार मार्ग काढण्यात येईल.
सतत होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या त्रासामुळे स्थानिक नागरिक संबंधित वाहतूक शाखेवर तीव्र नाराजी व्यक्त करत आहे व या वरील प्रतिक्रियेवर संबंधित अधिकारी कुठला पर्यायी मार्ग काढणार आहे. कशा प्रकारे या झालेल्या घटनेवर कारवाई करणार आहेत हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.