प्रतिनिधी(पुणे) – दिं – १७– अपर पोलीस महासंचालक प्रशांत बुरडे तसेच कारागृह व सुधारसेवा, पुणे डॉ. जालिंदार सुपेकर विशेष पोलीस महानिरीक्षक (मुख्यालय) कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे संकल्पनेतुन स्वाती साठे, कारागृह उपमहानिरीक्षक, पश्चिम विभाग, येरवडा, पुणे यांचे मार्गदर्शनाखाली दि.१४.११.२०२४ रोजी ” बंदी गळाभेट ” उपक्रम येरवडा मध्यवर्ती कारागृह व येरवडा महिला कारागृह येथे राबविण्यात आला.
सदर ” बंदी गळाभेट ” उपक्रमचा उद्देश कारागृहातील शिक्षाबंद्यांची शिक्षा भोगुन पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींनी आणि समाजाने त्यांना स्विकृत करुन आणि त्यांना समानतेची वागणूक मिळावी आणि बंद्यांना आपल्या कुटुंबाबद्दल सहानुभुती व आपूलकी निर्माण होण्याच्या व कारागृह विभागाच्या “सुधारणा व पुर्नवसन” या बिद्र वाक्याचा उद्देश साध्य होण्याच्या दृष्टीने शिक्षाधीन बंदी आणि त्याच्या १८ वर्षाखालील मुले-मुली, नात-नातू यांची समक्ष भेट घडवून आणणे आवश्यक होते, जेणेकरुन समक्ष भेटीत बंदी व त्यांचे नातेवाईकांमध्ये सुसंवाद झाल्याने घरापासून जास्त कालावधीसाठी लांब राहील्याने येणारी निराशा / मानसिक ताणतणाव कमी होण्यास मदत होईल. त्यानुषंगाने हा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. दि.१४.११.२०२४ रोजी सदर उपक्रमामध्ये येरवडा मध्यवर्ती कारागृह व येरवडा महिला कारागृह येथील ६७ पुरुष व २० महिला बंदी व त्यांचे १५७ मुले-मुली, नात-नातू व भाऊ-बहीण यांनी प्रत्यक्ष भेटी घेवून सहभाग नोंदवला. बंदी गळाभेट उपक्रमामुळे बंदी व त्यांचे लहान मुले-मुली यांची प्रत्यक्ष भेट मिळाल्याने बंद्यांनी कारागृह प्रशासनाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. या उपक्रमामुळे कारागृह प्रशासनाप्रती बंद्यांचा विश्वास निर्माण होत असून त्यायोगे सुधारणा व पुर्नवसन हे कारागृह विभागाचे ब्रिद वाक्य साध्य होत आहे.
सदर उपक्रम मा. श्रीमती. स्वाती साठे, कारागृह उपमहानिरीक्षक, पश्चिम विभाग, पुणे व श्री. सुनिल एन ढमाळ, अधीक्षक, येरवडा मध्यवर्ती कारागृह यांचे उपस्थितीत पार पाडला. तसेच सदर उपक्रमाचे यशस्वी नियोजनासाठी श्रीमती. पल्लवी कदम, अति. अधीक्षक, डॉ. भाईदास ढोले, उपअधीक्षक, श्री. रविंद्र गायकवाड, उपअधीक्षक, श्री. मंगेश जगताप, उपअधीक्षक, श्री. आनंदा कांदे, वरीष्ठ तुरुंगाधिकारी, श्रीमती सुषमा चव्हाण, तुरुंगाधिकारी श्रेणी -१, श्री सी आर सांगळे, तुरुंगाधिकारी श्रेणी२, श्री. योगेश पाटील, शिक्षक श्री. संदीप दिघे, समाजसेवक श्री. सतिष कदम, सुभेदार तसेच इतर कारागृह अधिकारी/ कर्मचारी यांनी कामकाज पाहीले