शिरूर –शिरूर हवेली विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीच्या प्रचार शिगेला पोहोचलेला असून या प्रचारादरम्यान घोडगंगा कारखाना व त्याची झालेली अवस्था मुख्य मुद्दा राहिला आहे. सभासदांच्या मते अशोक पवार यांनी स्वतःच्या कारखान्यासाठी घोडगंगा कारखाना कर्जात ढकललेला असून येथील कामगारांच्या चुलीमध्ये पाणी ओतायचं काम केलेलं आहे. आता निवडणुकीच्या तोंडावर पक्ष प्रमुख म्हणत आहेत की कारखाना सुरू करून दाखवतो मग एवढे वर्ष का सुरू केला नाही हा प्रश्न शिरूर मधील सभासद विचारू लागले आहे.
कामगारांचा एल्गार पाहून कारखाना प्रशासनाने कामगारांना पत्र काढून कामावर हजर होण्याचे आवाहन केलेले असून कारखाना प्रशासन पगार देणार आहेत असे घोषित केलेले आहे परंतु निवडणुकीत समोर पराभव दिसल्याने हा निर्णय घेतल्याचं सभासद बोलत असून निवडणूक आहे तोपर्यंत पगार देतील व पुन्हा पगार थकवतील असे कामगार बोलत आहे त्यामुळे कामावर जाण्यास कामगार तयार नाही असे चित्र आहे.
याबाबत कारखान्याचे माजी उपाध्यक्ष बाबासाहेब फराटे यांच्याशी बोलणे झाले असता त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या व कारखान्याचा पूर्व इतिहास स्पष्ट केला
शिरूर:२५ ते ३० लाख टन ऊस असलेला रावसाहेब दादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखाना राज्याचे सोनं आहे.हा कारखाना बंद पडण्यामागे कारखान्याच्या अध्यक्षांचा पूर्व नियोजित कट असून हा कारखाना खाजगी करून स्वतः मालक होण्याचा यांचा प्लॅन आहे. हा प्लॅन आम्ही कदापि यशस्वी होऊ देणार नाही.
फराटे म्हणाले, घोडगंगा कारखान्याची परिस्थिती अतिशय चांगली होती. कामगारांचे पगार वेळेवर व्हायचे.शेतकऱ्यांना त्यावेळी उचलही दिली जायची.कारखाना शिलकीत असायचा.अशातच कारखान्याचे अध्यक्ष अशोक पवार यांनी को जन प्लांट सुरू करण्याचा प्रस्ताव पुढे आणला. याला आम्ही विरोध केला.कोजन पेक्षा कारखान्याच्या विस्तार करण्याचा प्रस्ताव आम्ही दिला.मात्र अध्यक्षांनी ते ऐकले नाही. कोजन प्लांट किती फायद्याचा आहे हे आम्हाला पटवून दिले. यामुळे आम्ही सहमती दिली. एक मेगावॅट कोजन लाईट तयार करण्यासाठी चार ते साडेचार कोटी रुपये खर्च येतो.याप्रमाणे १८ मेगावॅट साठी निगोसेशन गृहीत धरता साधारण ७० ते ७२ कोटी रुपये खर्च अपेक्षित होता.यासाठी लागणाऱ्या टर्बाइन ब्रँडेड कंपनी त्रिवेणी यांच्याकडून घेणे अपेक्षित असताना क्षमता कमी असलेल्या कंपनीकडून टर्बाइन त्यावेळी घेण्यात आले.७० ते ७२कोटी रुपये यासाठी अपेक्षित असताना १२६ कोटी रुपये खर्च दाखवण्यात आला. यात नाहक ४५ ते ५० कोटी रुपये ज्यादा खर्च झाला. घोडगंगा नंतर दोन वर्षांनी श्रीगोंदा सहकारी साखर कारखान्याने २६ मेगावॅटचा प्रकल्प सुरू केला.यास फक्त ९० कोटी रुपये खर्च आला. गेल्या चार ते पाच वर्षापासून कारखाना अडचणीत असल्याचे सांगून झिरो मेंटेनन्स अंतर्गत मेंटेनन्स केला जायचा. यासाठी एक कोटी रुपये खर्च करायचे आणि अहवाल छापला की त्यात पाच ते सहा कोटी रुपये दाखवायचे. कारखाना अडचणीत आहे तर कारखान्यातील भंगार विकूया यातून काही पैसे मोकळे होतील.असे एकदा अध्यक्षांना सांगितले.
त्यावेळेच्या एका संचालकाने भंगार साठी एक पार्टी असल्याचे सांगितले.ती पार्टी चाळीस हजार रुपये टनाने भंगार घेण्यास तयार होती.फराटे म्हणाले,याबाबत अध्यक्ष पवार यांना अवगत केले असता. त्यांनी ऑनलाईन टेंडर झाल्याचे सांगितले. संचालक मंडळाची कुठलीही परवानगी न घेता हे टेंडर करण्यात आले होते. या भंगार विक्रीत ४ ते साडे ४ कोटी रुपये मिळणे अपेक्षित असताना म्हणजेच तशी पार्टी विकत घेण्यास तयार असताना अध्यक्षांनी ऑनलाइन दिलेल्या टेंडर नुसार केवळ ८५ लाख रुपये कारखान्यास प्राप्त झाले.असे दाखवण्यात आले. अशाप्रकारे जिथे जमेल तिथे कारखान्याची लूट करण्याचा अध्यक्ष पवार यांनी सातत्याने प्रयत्न केल्याचे फराटे यांनी सांगितले. घोडगंगाची डिस्टिलरी ३५ हजार लिटरची आहे.आम्ही ती ७० हजार लिटर करण्याची मागणी केली. मात्र ती मान्य करण्यात आली नाही.आज व्यंकटेश कृपा या कारखान्याची डिस्टिलरी दीड लाख लिटरची आहे.या कारखान्याचे गाळप आता प्रतिदिन ७ हजार टनाने चालणार आहे. घोडगंगा मात्र अजूनही अडीच हजार टनाचाच आहे. मागच्या वर्षी कारखाना चालू करण्यासाठी ३५ कोटी रुपये कर्ज मिळाले.मात्र शेतकी,डिस्टिलरी असे महत्त्वाचे अधिकारी व्यंकटेशकृपा कडे नेले आणि कारखाना सुरू करण्यासाठी तात्पुरता नवीन शेतकरी अधिकारी नियुक्त केला.मात्र खोलून ठेवलेला कारखाना जोडला नव्हता, कुठल्याही परवानग्या घेतलेले नव्हत्या.यातच लेबर भरायचे म्हणून चार ते पाच कोटी रुपयांचा ॲडव्हान्स वाटला.मात्र कारखाना सुरू झाला नाही.हे सर्व लेबर व्यंकटेश कृपाकडे पाठवण्यात आले. इथेही घोडगंगेचे नुकसान केले.एकूणच अध्यक्ष पवार यांनी हेतू पुरस्सर घोडगंगाची वाट लावली असून एवढी निवडणूक काढायची आणि त्यानंतर बँकेची जप्ती आल्यानंतर शासनाकडून हा कारखाना चालवायला द्यायचा म्हणजेच तो स्वतःकडे घ्यायचा असा पवार यांचा प्लॅन असून तो प्लॅन आम्ही कदापि यशस्वी होऊ देणार नाही.