प्रतिनिधी(पुणे) – दिं- १७ — समर्थ पोलीस ठाण्यात २१-०८-२०२४ रोजी दाखल गुन्हयातील फिर्यादी यांची राहते घरासमोर पार्क केलेली अॅक्टीव्हा दुचाकी अज्ञात इसमाने चोरी केली बाबत समर्थ पोलीस स्टेशन, पुणे शहर येथे गुन्हा रजि नंबर १८१/२०२४ भारतीय न्याय संहिता २०२३ कलम ३०३(२), अन्वये गुन्हयातील दाखल गुन्हयाचे अनुषंगाने वरिष्ठांचे आदेशाने तपास पथकातील अधिकारी व अमंलदार दाखल गुन्हयातील चोरीस गेलेले वाहन तसेच चोरटया इसमाचा शोध घेत असताना सपोफौ संतोष पागार, यांचे गुप्त बातमीदारा कडुन सदरची दुचाकी चोरी करणाऱ्या इसमा बाबत माहिती मिळाल्याने सदर खबरी ची शहानिशा केली असता आरोपी नामे राकेश जॉनी सकट, वय २४ वर्षे, रा.२२६, शिवाजी आखाडा, मंगळवार पेठ, पुणे. सध्या रा. ताडीवाला रोड, पुणे याने सदरची मोटर सायकल चोरी केल्याचे तपासात निष्पन्न झालेवरून नमुद आरोपीचा दिनांक १३/११/२०२४ रोजी येरवडा कारागृहातुन दाखल गुन्हयात ताबा घेऊन आरोपीकडे दाखल गुन्हयाच्या अनुषंगाने तपास केला असता त्याने समर्थ पोलीस स्टेशन हद्दीतुन ०२ दुचाकी वाहने चोरी केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने ०२ दुचाकी वाहने जप्त करण्यात आली आहेत. तसेच आरोपीच्या राहते घराची घरझडती घेतली असता आरोपीकडे ०१ चोरीचा लॅपटॉप मिळुन आला असुन सदरचा लॅपटॉप आरोपीने दत्तवाडी परीसरातुन चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे.
यामध्ये समर्थ पोलीस स्टेशन कडील वाहन चोरीचे दोन गुन्हे व पर्वती पोलीस स्टेशन कडील एक गुन्हा असे एकुण ०३ चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
सदरची कामगिरी ही पोलीस उपआयुक्त, परिमंडळ १, पुणे शहर, संदीपसिंह गिल, सहाय्यक पोलीस आयुक्त, फरासखाना विभाग, पुणे शहर, नुतन पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, समर्थ पोलीस स्टेशन, पुणे शहर. उमेश गित्ते यांचे मार्गदर्शनानुसार तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक जालिंदर फडतरे, सहा. पो. फौज, संतोष पागार, पो. अमंलदार इम्रान शेख, रोहीदास वाघेरे, रविंद्र औचरे, शिवा कांबळे, अमोल गावडे, रहीम शेख, शरद घोरपडे, बोराडे, अर्जुन कुडाळकर यांनी केली आहे.