प्रतिनिधी – दि.०७– रोजी रात्रीच्या दरम्यान मा. वरिष्ठांचे आदेशान्वये पोलीस निरीक्षक श्री. वाहीद पठाण, अति कार्यभार गुन्हे शाखा युनिट ०५ पुणे शहर हे त्यांचे ताबे पोलीस अंमलदार यांचेसह मार्केटयार्ड पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील हॉटेलमध्ये अवैधरित्या सुरु असलेले हुक्का पार्लर चेकींग करीत असताना दि बिलीयन्स हॉटेल आई माता मंदीर जवळ, मार्केटयार्ड पुणे या ठिकाणी अवैधरित्या हुक्का पुरवला जातो अशी बातमी मिळाली होती.
मिळालेल्या माहितीनुसार पोलीस निरीक्षक श्री. वाहीद पठाण व इतर पोलीस स्टाफसहीत हॉटेल दि बिलीयन्स या ठिकाणी छापा टाकुन कारवाई केली कारवाई दरम्यान हॉटेलमध्ये हुक्का पिण्याचे साहित्य वक हुक्का पॉट, हुक्का फ्लेवर, इतर साहित्य रोख रक्कम असा एकुण ३२,०००/- रु.किं.चा मुद्देमाल सापडला सदर माल जप्त करुन हॉटेल चालक नामे आरीफ शब्बीर शेख वय २४ वर्षे रा. साईबाबा नगर कोंढवा खुर्द पुणे तसेच हॉटेल मधील ०३ वेटर कामगार यांचेविरुध्द सिगारेट व अन्य तंबाखूजन्य उत्पादने (महाराष्ट्र सुधारणा) सन २०१८ कलम ४ अव २१ अ अन्वये कारवाई करुन मार्केटयार्ड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला. पुढील कार्यवाही साठी मार्केटयार्ड पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आलेले आहे.
सदरची कामगिरी मा.अपर पोलीस आयुक्त, गुन्हे श्री. शैलेश बलकवडे, मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे श्री. निखिल पिंगळे, मा. सहायक पोलीस आयुक्त गुन्हे २ श्री. राजेंद्र मुळीक यांचे सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे पोलीस निरीक्षक श्री. वाहीद पठाण अति. कार्यभार युनिट ०५ गुन्हे शाखा, पुणे शहर, सपोनि मदन कांबळे, पोलीस अंमलदार पृथ्वीराज पांडुळे, प्रमोद टिळेकर, कानिफनाथ कारखिले, उमाकांत स्वामी व शेखर काटे यांचे पथकाने केली आहे.