पुणे – दि- .२/१२/२०२४ रोजी रात्रौ बंडगार्डन पोलिस ठाणे कार्यक्षेत्रात एस.एस.पी.एम. एस कॉलेज सगोर, बंडगार्डन वाहतुक विभागाचे व बंडगार्डन पोलोस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार असे नाकाबंदी करत असताना नाकाबंदी दरम्यान एका कारचालकाने बॅरिकेटला धडक देवून बॅरिकेटस सह महिला पोलीस अंमलदार दिपमाला राजु नायर यांना फरपटत नेले त्याबाबत पोलीस अंमलदार विजयकुमार जगताप यांनी दिलेल्या फिर्यादी वरून बंडगार्डन पोलीस ठाणे गु.र.नं. ३६३/२०२४ भा. व्या.सं. कलम ११० प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे.
दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने मा. अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे, पुणे शहर.श्री. शैलेश बलकवडे, व मा. पोलीस उप आयुक्त, गुन्हे पुणे श्री निखिल पिंगळे, यांनी युनिट १, युनिट २, युनिट ४ यांना तसेच मा. पोलीस उन आयुक्त परि २, श्रीमती स्मार्तना पाटील यांनी दाखल गंभीर गुन्हयाचा संमातर तपास करुन अनोळखी आरोपीस ताब्यात घेणे बाबत आदेश दिले.
त्याप्रमाणे बंडगार्डन पोलीस ठाणे व गुन्हे शाखा हे दाखल गन्ह्याचा समांतर तपास करीत असताना सदर कार ही कोरेगांव पार्क येथिल हॉटेलमधुन बाहेर पडल्याचे दिसल्याने सदर हॉटेलमध्ये जावून युनिट ०२ कडील अधिकारी व अंमलदार यांनी हॉटेलमधुन अपघातातील आरोपीबाबत गोपणीय माहीती प्राप्त करुन युनिट-०४ चे पथक व युनिट २ चे पथकाने अपघातातील कारचालक हा जनवाडी परिसरात असल्याची माहीती प्राप्त केली. तसेच सदरची कार ही खड़की टाईप रेंज हिल्स भागातील असलेबाबत माहीतीची मिळाली. सदर अपघातातील कार ही बंडगार्डन पोलीस ठाण्याचे तपास पथकाने ताब्यात घेतली
वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय वाघमारे हे पथकासह जनवाडी भागात पेट्रोलिंग करुन अपघात करणारे इसमाचा शोध घेत असताना पोलीस उप निरीक्षक वैभव मगदुम यांना त्यांचे बातमीदारामार्फत माहीती मिळाली की, नाकाबंदी दरम्यान पोलीस कर्मचायाला बॅरिकेटसह धडक देवून पळून जाणारा इसम हा जनवाडी येथुन गावी जाणार असलेबाबतची माहीती मिळाल्याने ताबडतोब बातमीच्या ठिकाणी जाऊन त्यास पकडून त्याची विचारपूस केली त्याने त्याचे नाव अर्नव पवनकुमार सिंघल वय २४ वर्षे, रा. जी/१, जिंजर अपार्टमेंट, ऑर्चिड बी, राजाका ताल फिरोजाबाद, राज्य-उत्तरप्रदेश असे सांगितले. त्याचेकडे दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने माहीती घेतली असता त्याने सांगितले की आम्ही मित्रासह कोरेगांव पार्क येथे पार्टीकरण्यासाठी गेलो होता पार्टी नंतर घरी जात्त असताना एस.एस.पी.एम. एस. कॉलेजजवळ पोलीसांनी आमची कार बाजुस घेण्यास सांगितली असता मी तेथे लावलेल्या बॅरिकेट्सला धडक देवून तेथुन पळुन गेलो असल्याचे सांगितलेने त्यास ताब्यात घेवुन युनिट ४ कार्यालयात आणुन बंडगार्डन पोलीस स्टेशन चे ताब्यात दिले आहे. गुन्हयाचा पुढील तपास बंडगार्डन पोलीस स्टेशन करीत आहेत.
सदरची उल्लेखनिय कामगिरी मा. पोलीस आयुक्त श्री. अमितेशकुमार, मा. पोलीस सह आयुक्त श्री. रंजनकुमार शर्मा, मा.अपर पोलीस आयुक्त गुन्हे, श्री शैलेद्र बलकवडे, मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे श्री. निखिल पिंगळे, मा. पोलीस उप आयुक्त झोन-०२ स्मार्तना पाटील, मा. सहा. पोलीस आयुक्त गुन्हे-१ श्री. गणेश इंगळे, मा. सहा. पोलीस आयुक्त गुन्हे-२ श्री. राजेंद्र मुळीक, मा. सहा. पोलीस आयुक्त दिपक निकम लष्कर विभाग पुणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अजय वाघमारे युनिट-०४, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप मानकर युनिट-०२. वरिष्ठ गोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद युनिट-०१, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र गायकवाड बंडगार्डन पोलीस ठाणे, सहा. पोलीस निरीक्षक, नंदकुमार कदम, स्वप्नील लोहार बंडगार्डन पोलीस ठाणे, पोलीस उप निरीक्षक, वैभव मगदुम नितीन कांबळे तसेच युनिट ०४ चे पथक युनिट २ चे पथक, तसेच बंडगार्डन पोलीस ठाण्याचे तपास पथक यांनी केली आहे.