पुणे (हवेली) : घोडगंगा साखर कारखान्याच्या सभासदांची पाच एकर जमीन लिहून घेतली तर घेतली पण या पट्यानं निष्ठावंत ची पण तीन एकर जमीन लिहून घेतली. असा घणाघात वाबळेवाडीच्या बाळासाहेब वाबळे यांनी महाविकास आघाडीचे शिरुर हवेलीचे उमेदवार अशोक पवार याच्यावर केले.
नाव बाळासाहेब भाऊसाहेब वाबळे गाव वाबळेवाडी, व्यवसायाने शेतकरी, ओळख वीस वर्षापासून अशोक बापूचा एकनिष्ठ कार्यकर्ता अशी तालुक्यात ओळख.
वाबळेवाडीच्या प्रकरणात सगळी वाबळेवाडी अशोक पवार यांच्या विरोधात उभी राहिली. तरीही हा एकनिष्ठ गडी (बाळासाहेब वाबळे) हा बापू सोबत निष्ठेने उभा राहिला.
व्हिडिओ च्या आधारे माहिती__अशी की याच बाळासाहेब वाबळे ची जमीन पुनर्वसनाला गेली. तो गट अशोक पवार यांच्या खाजगी कारखान्याच्या शेजारी रस्त्या लगत होता.
रस्त्या लगतचा हिस्सा गेला तर त्यांना मागची जमीन असता येणार नव्हती. म्हणून हे प्रकरण आमदार अशोक पवार यांच्या कानावर घातली. आणि तिथेच खेळ फसला. बाळासाहेब यांना अंधारात ठेवून पुढच्या दोन दिवसात तीन एकर जमीन खरेदी खत करून टाकले.
अशा धक्याने बाळासाहेब व कुटुंब उध्वस्त झाले. वीस वर्षांपासून ज्याच्यावर विश्वास ठेवला एक निष्ठेने चाकरी केली. त्यानेच फसवल होत. आयुष्यातुन उठवल होत.
आमदार यांनी जमीनीचा ताबा घेण्यासाठी मोजणी आणली पोलीस बंदोबस्तात, प्रशासनाला हाताशी धरून, आमदारकी च्या अधिकारातून फक्त एका कुटुंबांच्या विरोधाला मोडीत काढले. आमदारांनी होती नव्हती तेवढी ताकत पणाला लावली तीन वेळा प्रयत्न करूनही आमदार ताबा घेऊ शकले नाहीत.
यातच बाळासाहेब यांना विरोधकांकडून पाठिंबा मिळाला. पण ज्याच्यावर विश्वास ठेवला त्याने राक्षस बनून केसाने गळा कापला अशी संतप्त प्रतिक्रिया व्हिडिओ च्या माध्यमातून दिली.
झालेल्या अन्याया विरोधात बाळासाहेब वाबळे यांनी शिरुर व हवेलीच्या जनतेला आवाहन केले.
की वीस वर्षापासूनच्या एकनिष्ठ कार्यकर्त्याशी जर कोणी दगाबाजी करत असेल तर तो नेता तर सोडा, माणूस म्हणून घ्यायच्या तरी लायकीचा आहे का? काहीही करा पण ही राक्षसी प्रवृत्ती या निवडणुकीत गाडा नाही तर आपल्या तालुक्याचे भविष्य धोक्यात आहे. शिरूरचा बिहार व्हायला वेळ लागणार नाही. सर्वांना हात जोडून विनंती करतो हा राक्षस संपवा.. असा विडिओ सोशल मिडिया वर वायरल करत जनतेला व्हिडिओ शेअर केला..