हवेली – कोंढवा येथे नुकताच बनावट कागदपत्रे वापरून सातबारा केल्याचा आरोपमध्ये संबंधित हवेली तहसीलदार कार्यालय अंतर्गत येणाऱ्या कोंढवा तलाठी व इतर इसमावर गुन्हा दाखल झाल्याने महसूल विभागात मोठी खळबळ झाली आहे.असा गुन्ह्यामुळे महसूल विभागाची प्रतिमा मंजूर होताना दिसत आहे.
फुरसुंगी तलाठी कार्यालयात लाचलुचपत विभागाचा आरोपी पुन्हा सेवेत दिसल्याने खळबळ…
काही दिवसांपूर्वी हवेली तालुक्यातील फुरसुंगी तलाठी कार्यालयातील एका खाजगी इसमावर सातबारा नोंदणीसाठी तलाठी यांना देण्यासाठी पाच रुपये घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एका खाजगी इसमास अटकेची कारवाई केली होती केले.
तलाठ्याला देण्यासाठी पैसे घेणारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा आरोपी खाजगी एजंट पुन्हा त्याच तलाठीच्या कार्यालयात तलाठी असताना सेवेमध्ये दिसल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
काही दिवसांपूर्वी झालेल्या कारवाई मध्ये तलाठी यांचा सहभाग असल्याची हवेली तालुक्यात चर्चा रंगू लागल्याने संबंधित कार्यालयाचे वरिष्ठ अधिकारी फुरसुंगी तलाठी यांच्यावर काय कारवाई करणार याकडे नागरीकांचे लक्ष लागून आहे.