प्रतिनिधी – दि.०६ रोजी श्रीराम नवमी दिवशी वरीष्ठांच्या आदेशाचे बंदोबस्त दरम्यानच्या वानवडी पोलीस ठाणे हद्दीमध्ये पेट्रोलिंग करणे व अवैध धंद्यांना प्रतिबंध करणेकामी वानवडी पोलीस स्टेशन चे तपास पथकाचे प्रभारी पोलीस उप निरीक्षक धनाजी टोणे व पथकातील इतर स्टाफ असे पेट्रोलिंग करीत असताना तपास पथकांस मिळालेल्या माहितीनुसार स.नं.१७, बालाजी दर्शन, चौथा मजला, प्लॅट नं.४०४, फातिमानगर, वानवडी, पुणे येथुन एक इसम हा त्यांचे ओळखीचे ग्राहकांकडुन रेसकोर्सध्या घोडयांवर जुगार घेत आहेत.
स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी भारतात चालणारे घोडयांच्या रेसवर ऑनलाईन जुगार, व पैशाची देवाणा-घेवाण करताना पोलीस छाप्यात मिळून आले .छाप्याच्या ठिकाणी ते स्वतः जुगार खेळत असलेले मिळुन आले. त्यांचे ताब्यातुन एकुण ५५,०००/-४ कि.चे जुगाराकरीता वापरलेले मोबाईल व इतर मुद्देमाल मिळुन आल्याने त्यांचेविरुध्द वानवडी पोलीस ठाणे, गुन्हा रजि. नं. १५६/२०२५ महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम कलम ४ व ५ प्रमाणे कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. नमुद आरोपीना भा.न्या.सं. कलम २९ प्रमाणे नोटीस देण्यात आली असुन पुढील तपास पोलीस उप निरीक्षक धनाजी टोण हे करीत आहे.
सदरची कारवाई ही मा. पोलीस उप-आयुक्त, परि-०५ पुष्णे शहर डॉ. राजकुमार शिंदे, मा. सहा. पोलीस आयुक्त, वानवडी विभाग, पुणे शहर, श्री. धन्यकुमार गोडसे, वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. सत्यजित आदमाने, व पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. गोविंद जाधव, वानवडी पो.स्टे. पुणे शहर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलीस उप-निरीक्षक, धनाजी टोणे, पोलीस अंमलदार सोमनाथ कांबळे, विष्णु सुतार, गोपाळ मदने, अमोल गायकवाड, अभिजित चव्हाण व बालाजी वाघमारे या पथकाने केली आहे.