प्रतिनिधी पुणे – कात्रज-कोंढवा रोडवरील विश्वजीम जवळ कनेक्टीफाय इन्फोटेक नावाचे रिअल इस्टेटचे ऑफीस अज्ञात चोरटयांनी फोडून रोख रकमेसह, सॅमसंग कंपनीचा मोबाईल हॅण्डसेट व इतर इलेक्ट्रानिक साहीत्य असे मिळून एकुण १,४३,०००/- रु. किमतीचा मुद्देमाल चोरी केले बाबत फिर्यादी यांनी फिर्याद दिल्याने भारती विद्यापीठ पोलीस ठाणेस घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नमुद गुन्हा उघडकीस आणणे बाबत मा. वरीष्ठ पोलीस निरीक्षक डी. एस. पाटील यांनी तपास पथकाचे अधिकारी व पोलीस अंमलदार यांना सुचना देवुन मार्गदर्शन केले होते.
तपास पथकातील पो. अधिकारी व पो. अंमलदार दाखल गुन्ह्याचा तपास करीत असताना पोलीस अंमलदार मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सागर बोरगे, महेश बारवकर यांना सी.सी.टी.व्ही फुटेजच्या आधारे पहाणी करीत असताना सदरचा गुन्हा हा अभिलेखावरील आरोपी नामे १) कृष्णा कुमार देवेंद्र, वय २० वर्षे, रा. पर्वती दर्शन, पुणे २) अथर्व प्रदीप शेंडगे, वय १९ वर्षे, रा. म्हसोबा मंदीरा शेजारी, पर्वती दर्शन, पुणे यांनी केल्याचे निष्पन्न झाले सदर आरोपींचा शोध घेत असता ते लेकटाऊन सोसायटी परिसरामध्ये असल्याची गुप्त बातमीदारांमार्फत नमुद अंमलदारांना माहीती मिळाल्याने नमुद आरोपींना सापळा लावून शिताफिने पकडले असता त्यांचे ताब्यात रिक्षा मिळून आली सदर रिक्षाबाबत तपास करता सदरची रिक्षा चोरीस गेल्या बाबत भारती विद्यापीठ पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल असल्याची माहीती मिळाली, तरी नमुद आरोपींना अटक करून त्यांचेकडून रू १,५०,०००/- जु.वा. किंमतीची रिक्षा जप्त करण्यात आली आहे. तसेच खालील प्रमाणे गुन्हे उघडकीस आणण्यात आले आहेत.
१) भारती विदयापीठ पोलीस स्टेशन गु.र.नं १०८०/२०२४ भारतीय संहिता कलम ३३१(४).३०५ २) भारती विदया पीठ पोलीस स्टेशन गु.र.न १०८१/२०२४ भारतीय संहिता कलम ३०३(२) सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे श्री प्रविणकुमार पाटील, मा.पोलीस उप आयुक्त परिमंडळ २. श्रीमती स्मार्तना पाटील, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे श्री. राहुल आवारे, यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशन कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.डी. एस. पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीमती संगीता देवकाते, श्री. राहुल कुमार खिलारे, तपास पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार महेश बारवकर, मितेश चोरमाले, सागर बोरगे, मंगेश पवार, चेतन गोरे, सचिन सरपाले, सचिन गाडे, निलेश खैरमोडे, अभिनय चौधरी यांच्या पथकाने केली आहे.