पुणे – आगामी विधानसभा निवडणुक २०२४ च्या अनुशंगाने पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचे आदेशाने कायदा व सुव्यवस्था राखणेसाठी गुन्हे प्रतिबंधक कारवाई तसेच बेकायदेशीर हत्यार, अग्निशस्त्र वापरणारे यांचे विरोधात कडक कारवाईचे आदेश करण्यात आले आहेत. सदर आदेशाचे अनुशंगाने गुन्हे शाखा युनिट ६ चे कार्यक्षेत्रात मागील आठवड्यात दि. ०७/११/२०२४ रोजी काळेपडळ पोलीस ठाणे येथे गु.र.नं. १२४३ /२०२४ आर्म अॅक्ट कलम ३(२५) पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (अ) सह १३५ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. त्यातील *आरोपी नामे साहिल राजु शेख, वय २४ वर्षे धंदा व्यवसाय, रा.३८ मॅजेस्टिक पार्क, बी बिल्डिंग, फ्लॅट नं. १२०६. वडाची वाडी रोड, उंड्री पुणे* यांचे कडुन एक देशी बनावटीचे लोखंडी पिस्टल व दोन जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली होती.
सदर गुन्हयाचे अधिक तपासा दरम्यान दि. १०/११/२०२४ रोजी सदर गुन्हयाचे कामी आरोपी नामे जैद जावेद खान वय २२ वर्ष रा. धंदा हॉटेल व्यवसाय रा. फ्लॅट नं २०३ गणराज स्वप्नपुर्ती फेज २ हांडेवाडी पुणे याचे कडुन कौशल्यपूर्व तपास करून त्याचे कब्जात बेकायदेशीरीत्या विनापरवाना अग्निशस्त्र बाळगलेले निष्पन्न झाले असता त्याचे कडुन दोन देशी बनावटीचे लोखंडी अग्निशस्त्र व दोन जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली आहेत.
सदरची कामगीरी मा. पोलीस आयुक्त पुणे शहर अमितेश कुमार, मा. सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, मा. अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री शैलेश बलकवडे, मा. पोलीस उपआयुक्त (गुन्हे) श्री निखिल पिंगळे, मा. सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री राजेंद्र मुळीक गुन्हे शाखा युनिट -६ यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट ६ चे प्रभारी पोलीस निरीक्षक वाहिद पठाण, सहा. पोलीस निरीक्षक मदन कांबळे, पोलीस उपनिरीक्षक अविनाश लोहोटे, पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण दळवी, पो. हवा. रमेश मेमाणे, बाळासाहेब सकटे, नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले, ऋषीकेश ताकवणे, ऋषीकेश व्यवहारे, सचिन पवार, गणेश डोंगरे, शेखर काटे, नितीन घाडगे, सुहास तांबेकर, प्रतिक्षा पानसरे, किर्ती मांदळे यांनी केली आहे.