पुणे – समर्थ पोलीस स्टेशन, पुणे शहर येथे गुन्हा रजि नंबर-२५६/२०२४ भारतीय न्याय संहिता- २०२३ कलम ३०३(२) अन्वये दाखल गुन्ह्यातील फिर्यादी यांची ऑटो रिक्षा अज्ञात इसमाने चोरी केली म्हणुन वरील प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दाखल गुन्ह्यांचे अनुषंगाने वरिष्ठांचे आदेशानुसार तपास पथकातील अधिकारी/अंमलदार यांनी घटनास्थळ व आजुबाजुचे परीसरातील सीसीटीव्ही कॅमे-यांचे फुटेज तपासुन तसेच गुप्त बातमीदाराकडुन प्राप्त झालेल्या माहीतीचे आधारे आरोपी नामे आनंद उर्फ अक्षय प्रल्हाद साळुंखे वय २३ वर्षे, रा. मानकाई नगर, माहेरघर संस्था नजीक, आव्हाळवाडी, पुणे यास शिताफिने ताब्यात घेवुन आरोपीकडे तपास केला असता आरोपीकडुन नमुद गुन्ह्यांतील चोरीस गेलेली रिक्षा तसेच चतुश्रुंगी पोलीस स्टेशन कडील चोरीस गेलेली १ रिक्षा व हडपसर पोलीस स्टेशनकडील चोरीस गेलेली १ मोटर सायकल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये समर्थ पोलीस स्टेशन कडील १ गुन्हा, चतुश्रुंगी पोलीस स्टेशन कडील १ गुन्हा व हडपसर पोलीस स्टेशनकडील १ गुन्हा असे एकुण ३ वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
सदरची कामगिरी ही मा. अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे श्री प्रविण पाटील, मा.पोलीस उप आयुक्त परि १. पुणे शहर श्री. संदीपसिंह गिल्ल, मा. सहा. पोलीस आयुक्त विश्रामबाग विभाग, पुणे, (अति. कार्यभार फरासखाना विभाग, पुणे शहर,) श्री साईनाथ ठोंबरे समर्थ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. उमेश गित्ते यांचे मार्गदर्शनानुसार तपास पथकातील पोलीस उप निरीक्षक जालिंदर फडतरे, सहा. पो. फौजदार संतोष पागार, पोलीस अमलदार इम्रान शेख, रविंद्र औचरे, शिवा कांबळे, अमोल गावडे, रहीम शेख, शरद घोरपडे, कल्याण बोराडे यांनी केली आहे.