प्रतिनिधी अक्षय दोमाले
पूणे (हडपसर) : कात्रज परिसरातील संतोषनगर व आसपासच्या परिसरातील महिलांनी बधे यांच्या समोर आपल्या समस्या मांडल्या. त्यावेळी गंगाधर बधे म्हणाले, समोर दिसतायत त्याच समस्या तुम्ही माझ्या पुढे मांडल्या. हीच तळमळ मला स्वस्थ बसू देत नव्हती. म्हणूनच निवडणूक लढवायची व ती जिकांयचीच या उदेशाने एअर कंडिशनर चिन्ह घेवून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूकीत उतरलो आहे.
कोंढवा अडीअडचणीत मदतीला धावणारे, चुटकीसरशी कामे मार्गी लावणारे, वेळ प्रसंगी स्वखर्चातून कामे करुन दिलासा देणाऱ्या आण्णांना या निवडणूकीत आमचा पाठींबा आहेच.
याशिवाय एअर कंडिशनर हे चिन्ह घराघरात पोहचवून गंगाधर (आण्णा) बधे यांना विजयी करण्याचा संकल्प महिला व तरुणांनी केला आहे. हडपसर विधानसभा मतदार संघातील अपक्ष उमेदवार गंगाधर बधे यांनी गाठीभेटी व लोकांशी संवाद असा प्रचार सुरु केला असून, महिलासह नागरिकांचा मोठा
पाठींबा मिळताना दिसत आहे.
महिनाभरात महागाई किती वाढली. इतकी वाढली की, माता भगिनींचे महिन्याचे बजेट कोलमडले आहे. मतदार संघातील विकासाला खिळ बसलीय, लोक अपेक्षेने पाहातायत. पण त्यांच्याकडे कोणी लक्ष देत नाही. आता तुम्ही साथ द्या, तुमच्या साक्षीने हडपसर मतदारसंघाचे नंदनवन करु, असे बधे यांनी सांगितले.
“मतदार संघाची झालेली दयनीय आवस्था, बेरोजगारी, महिला भगिनींच्या न्याय हक्कासाठी, सर्व धर्मियांच्या आशिर्वादाने गंगाधर बधे एअर कंडीशनर हे चिन्ह घेवून, अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत.
प्रत्येक ठिकाणी त्यांना मतदारांसह सर्वांचाच चांगला पाठींबा मिळत आहे. हे सर्व पाहता बधे यांचा विजय निश्चित आहे. यात तिळमात्र शंका नाही. असे निष्ठावंत शिवसैनिक, माजी आमदार महादेव बाबर. यांनी यावेळी सांगितले.