प्रतिनिधी अक्षय दोमाले
हडपसर – महाराष्ट्रामध्ये विधानसभेची रणधुमाळी मोठ्या प्रमाणात सुरु आहे हडपसर विधानसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीकडून ऍड.अफरोज मुल्ला हे अधिकृत उमेदवार असून अफरोज मुल्ला यांच्या जनसामान्य जनतेमध्ये त्यांच्या सर्वांच्या मदतीला धावून जाण्याच्या व गोरगरीब गरजू व्यक्तींना मदत करण्याच्या सामाजिक कार्यामुळे अफरोज मुल्ला हे कायमच चर्चेत असतात
आताच वंचित बहुजन आघाडीची हडपसर विधानसभा मतदारसंघात भिमनगर येथे वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांच्या उपस्थितित मोठी विराट सभा पार पडली आहे
हडपसरमध्ये सुजात दादा आंबेडकर यांची विराट सभा झाल्यानंतर सर्वत्र या सभेची मोठी चर्चा होताना हडपसरमध्ये पाहायला मिळत आहे.सभेमध्ये सुजात दादा आंबेडकर यांनी सांगितले कि कितीही मोठा माणुस असला तरी त्याला एकच मतांचा अधिकार आहे ज्याज्या वेळी आपल्या समाजाचा न्यायाचा विषय पुढे आला त्यावेळी सगळ्यात आधी वंचित बहुजन आघाडी समाजाच्या अडचणी सोडवण्यासाठी सगळ्यात पहीली पुढे आली आहे.
हडपसरमध्ये सध्या वंचित बहुजन आघाडीच्या विराट सभेचा चर्चेचा विषय झाला आहे.हडपसर विधानसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार ऍड.अफरोज मुल्ला हे तरुणांच्या मनातील टाईत झाले आहेत.
सुजात दादा आंबेडकर यांनी सर्व जनतेला सांगितले आहे कि आपले प्रश्न विधानसभेत मांडण्यासाठी येत्या वीस तारखेला गॅस सिलेंडर या चिन्हावर बटन दाबून आपला वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार ऍड.अफरोज मुल्ला यांना विधानसभेत पाठवायचे आव्हान सर्व जनतेला केले आहे
यंदा हडपसर विधानसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचे ऍड.अफरोज मुल्ला हे एक तरुण व जनसामान्य जनतेच्या मदतीला धावून येणारे आमदार होणार असल्याची चर्चेस उधाण आले आहे.