पुणे (हडपसर) : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या रोड शो मध्ये नागरिकांनी उत्साहात स्वागत करत महायुतीचे उमेदवार चेतन तुपे पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित या रोड शो ने उमेदवारासह कार्यकर्त्यांचा उत्साह दुनावल्याचे चित्र दिसून आले.
गाडीतळ, हडपसर गाव, मगरपट्टा कॉर्नर, शंकर मठ, वैदूवाडी, रामटेकडी, म्हाडा कॉलनी, ससाणे नगर, हडपसर गावठाण अशा मार्गावरून हा रोड शो आयोजित करण्यात आला होता.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह उमेदवार चेतन तुपे पाटील यांनी नागरिकांना अभिवादन करीत घड्याळाला मतदान करण्याचे जाहीर आवाहन केले.
उपमुख्यमंत्री अजित पवार व उमेदवार चेतन तुपे यांचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे रॅलीला भव्य स्वरूप निर्माण झाले होते.
शिवसेना शहराध्यक्ष प्रमोद भानगिरे,राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश घुले, माजी महापौर राजलक्ष्मी भोसले, शशिकला ताई वाघमारे, वैशाली बनकर, भाजपाचे विधानसभा अध्यक्ष संदीप दळवी, अमर तुपे, वासंती काकडे, माजी नगरसेवक मारुती तुपे, फारुख इनामदार, सुनील बनकर, विजया कापरे, अशोक कांबळे, अभिमन्यू भानगिरे, भूषण तुपे, विठ्ठल विचारे पाटील, रवी तुपे, प्रशांत पवार, रूपेश तुपे, जयप्रकाश जाधव, महादेव दंदी, राजू कांबळे, जतिन कांबळे, योगेश सूर्यवंशी, संतोष खरात, नितीन होले, सतीश भिसे, स्मिता गायकवाड, मीनाक्षी अहिरे, खन्नासिंग कल्याणी, शक्तीसिंग कल्याणी, वामन धाडवे, अरुण अल्हाट, रामभाऊ कसबे, इम्तियाज मोमीन, महेश ससाणे आदी कार्यकर्ते रोड शो मध्ये सहभागी झाले होते.
कार्यकर्त्यांनी उमेदवाराच्या नावाच्या घोषणा देत रोडशो चा मार्ग दणाणून सोडला होता. दुपारी तीन वाजता सुरू झालेला हा रोड शो चा समारोप सायंकाळी हडपसर गांधी चौकात झाला. महाराष्ट्राच्या विकासाचं घड्याळ, कार्यकर्त्यांनी रोड शो च्या माध्यमातून रोडशोच्या मार्गातील परिसर पिंजून काढला..