पुणे- शहरातील कसबा मतदार संघाचे आमदार माननीय रविंद्र धंगेकर यांनी ड्रग्ज माफीया व पब संस्कृतीचा नायनाट करण्याचा विढा उचलेला आसल्याचे दिसून येते.ही पुणेकरांसाठी खुपच आंनदाची बातमी असून सत्तेत नसताना ही एक आमदार काय करू शकतो याचे उदाहरण इतर नेत्यांना दाखवून दिलेले आहे..
मध्यंतरीच्या काळात नोव्हेंबर २०२३ मध्ये ड्रग्ज माफीया ललित पाटील प्रकरणात याच आमदार महोदयांनी रात्रंदिवस पाठपुरावा केल्याने पुण्यात सर्वात मोठी कारवाई करण्यात आली हे जनसामान्यांच्या आठवणीत आहे.ललित पाटील याला मदत करणारे त्याचे मित्र आणि त्याच्याशी संबंधित लोकांवर कारवाई करण्यात आली होती.तसेच शासकीय कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर देखील कारवाई करण्यात आली होती .पुणे पोलिसांनी आपल्या पोलिसांवर देखील मोठी कारवाई केली होती..
ड्रग्स प्रकरणात ललित पाटील याला मदत करणाऱ्या दोन पोलिसांना अटक केल्याने पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली होती. ललित पाटील पलायन प्रकरणात पुणे पोलिस दलातील २ कर्मचाऱ्यांना देखील गुन्हे शाखेने अटक केली होती.या प्रकरणी ललित पाटील सह इतर १५ जणांवर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं तब्बल ३१५० पानांचे चार्जशीट पुणे कोर्टात सादर केलेले आहे.या प्रकरणात पुणे पोलिस आयुक्तांनी निष्काळजीपणा केल्याचा ठपका ठेवत दोन महिला पोलीस अधिकाऱ्यांसह दहा पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना निलंबित केले होते.
ससून रुग्णालयाचे डीन डॉक्टर संजीव ठाकूर यांचे विरोधात न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर राज्य सरकारनेही त्यांना पदमुक्त केले होते.तसेच ससून रुग्णालयाचे आर्थोपेडीक सर्जन डॉक्टर प्रविण देवकाते यांच्यावर राज्य सरकारने कारवाई केली होती. त्यांचे निलंबन केले. ससून रुग्णालय प्रकरणात राज्य शासनाने चौकशी समिती नेमली होती. चौकशी समितीचा अहवाल आल्यानंतर अनेक दिवस काहीच कारवाई झाली नव्हती. अखेर न्यायालयाच्या निकालानंतर ठाकूर यांच्यावर कारवाई झाली होती.
पुणे शहरातील कल्याणीनगर भागात घडलेल्या दुर्देवी हिट अॅण्ड रन प्रकरणात याच विद्यमान आमदार महोदयांनी भ्रष्ट शासन व्यवस्थेविरोधात सध्या प्रखर लढा देत असल्याचे महाराष्ट्रातील जनतेला माहीत आहे.
हे प्रकरण संपूर्ण भारत देशात गाजत आहे. या प्रकरणात रोजच्या रोज वेगवेगळे मुद्दे पुढे येत आहेत.वाहनाचा चालक बदलण्यापासून ते आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलण्याचा प्रकार उघडकीस आलेला आहे.आमदार मानणीय रविंद्र धंगेकर व प्रसार माध्यमातून प्रशासकीय व्यवस्थेवर दबाव निर्माण झाल्याने या घटनेत अनेक विभागातील प्रशासकीय व्यवस्था मॅनेज झाल्याचे समोर आले. या प्रकरणानंतर शहरामधील बेकायदेशीर पब व बार वर मोठी कारवाई करण्यात आली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने ही कारवाई केली असून पुण्यातील नियमबाह्य पब आणि बार पुणे जिल्हाधिकारी यांचे आदेशानुसार सील करण्यात आलेले आहेत पुण्यातील कल्याणीनगर अपघात प्रकरणानंतर आता इतर पब आणि बार मालकांचे धाबे दणाणले आहेत.
शैक्षणिक संस्कृती असलेले पुणे शहर हे पब संस्कृतीचे केंद्र बनले असून, या प्रकरणातील आरोपींना पाठिशी घालणाऱ्या प्रशासनातील भ्रष्ट व्यवस्थेचा पर्दाफाश करून पब संस्कृती हद्दपार करण्यासाठी आमदार रविंद्र धंगेकर निकराचा लढा देत आहेत.छत्रपतींच्या राज्यात पब मुळे युवकांच्या आयुष्याचे वाटोळे होवू नये तसेच युवकांच्या उज्वल भविष्यासाठी त्याचा हा लढा अतिशय महत्वाचा मानला जात आसून त्याचे संपूर्ण महाराष्ट्रात कौतुक होत आहे.
महाराष्ट्रातील नव्हे तर भारत देशातील सर्वच आमदारांनी आप आपल्या मतदारसंघात घडलेल्या घटनेचा तळात जावून पाठ पुरावा करुन प्रशासनावर नियंत्रण ठेवल्यास भारत देश हा भ्रष्टाचार मुक्त देश म्हणून ओळखला जाईल व देशातील जनतेला अच्छे दिन येतील .
आमदार हे भारतीय निवडणूक व्यवस्थेत राज्य विधानसभेसाठी मतदारसघाच्या मतदारांद्वारे निवडलेला लोक प्रतिनिधी असतो.शासकीय महसुलात जास्तीत जास्त वाढ होऊन,जास्तीत जास्त नियोजनात्मक खर्च करून ,जनतेला जास्तीत जास्त ,फायदे व सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी सदस्य ह्या नात्याने आमदाराना करावी लागते. तसेच प्रशासनाकडून कमी कालावधीत यशस्वी कामे करून घेण्यासाठी शासन दरबारी योग्य तो पाठपुरावा करीत प्रशासनावर दबाव ठेवून कामे करण्याची खूप मोठी जबाबदारी आमदारांनी पार पाडणे ही सध्याची गरज आहे.
तरी महाराष्ट्रातील सत्तेत आसलेले किंवा सत्तेत नसलेल्या आमदारांनी आप आपल्या मतदारसंघात जनतेच्या हितासाठी भ्रष्ट व्यवस्थेशी लढून मतदारांच्या विश्वासास पात्र अशी भूमिका बजावणे आवश्यक आहे.