पिंपरी(पुणे) :- दिं- १७ एप्रिल २०२४ आगामी लोकसभा निवडणुकांचे पार्श्वभुमीवर पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, यांनी लोकसभा निवडणूक २०२४ ही भयमुक्त व पारदर्शक तसेच निःपक्षपातीपणे पार पाडता याव्यात यासाठी व्यापक प्रतिबंध कारवाईचा आराखडा तयार केला असुन त्या अंतर्गत पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीतील गुन्हेगारी नियंत्रणावर बारकाईने लक्ष देवुन शरिराविरुध्दचे व मालाविरुध्दचे गुन्हे करणारे व लोकांमध्ये दहशत निर्माण करणारे सराईत गुन्हेगार यांचे हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवुन गुन्हेगारीचे समूळ उच्चाटन होईल यावर भर देण्याबाबत पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना निर्देश देण्यात आले आहेत. पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली सन २०२४ मध्ये आजपर्यंत पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्रातील ०९ संघटीत गुन्हेगारी टोळ्यांमधील एकुण ४४ आरोपींवर मोका कायद्यांतर्गत कारवाई केली आहे.
महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशन गु. रजि. नं १६४/२०२४, भादंवि कलम ३०२, ३६४, २०१, १२०(ब), २१२, ३४ या गुन्हयाचे तपासामध्ये आरोपी नामे १) राहुल संजय पवार (टोळी प्रमुख) रा. महाळुंगे इंगळे, ता खेड जि पुणे. २) अमर नामदेव शिंदे वय २८ वर्षे रा मु.पो. कासार आंबोली, ता. मुळशी, जि पुणे ३) नितीन पोपट तांबे वय ३४ वर्ष, रा. एफ/२०८, स्वदेशा सोसायटी, देहुगाव रोड, मोशी, पुणे. ४) अभिजीत ऊर्फ अभि चिंतामण मराठे रा. जयभवानी नगर कोथरुड पुणे. ५) आसिफ ऊर्फ आशू हैदर हाफशी रा. दत्तु पठारे चाळ, कासारवाडी, पुणे. यांच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर टोळी प्रमुख व त्याचे साथीदार यांच्यावर एकुण ०७ गुन्हे केल्याची नोंद आढळुन आलेली आहे.
प्रस्तुत प्रकरणातील टोळी प्रमुख याने त्यांचे साथीदारांसह अन्य सदस्यांसाठी प्रत्येक गुन्हयात काही सामाईक व काही नवीन साथीदार यांना सोबत घेवुन स्वतःची संघटीत टोळी तयार करुन अवैध मार्गाने आर्थिक फायदा मिळवण्याचे उद्देशाने स्वतःचे गुन्हेगारी टोळीचे वर्चस्व व दहशत प्रस्थापित ठेवण्यासाठी संघटित गुन्हेगारी संघटनेचा प्रमुख म्हणून किंवा संघटनेच्या वतीने एकटयाने किंवा संयुक्तपणे, हिंसाचाराचा वापर करुन अथवा हिंसाचाराची धमकी देवून किंवा धाक दपटशहा दाखवून टोळी प्रमुख व साथीदार यांनी महाळुंगे एमआयडीसी, चाकण, एमआयडीसी भोसरी, सांगवी, पॉड पोलीस स्टेशन हद्दीत खुन, खुनाचा प्रयत्न, खंडणी, अपहरण, खंडणीसाठी अपहरण, जबरी चोरी, बेकायदेशिर अग्निशस्त्रे जवळ बाळगणे अशा प्रकारेचे गंभीर स्वरुपाचे चढत्या क्रमाने गुन्हे दाखल आहेत. प्रत्येक गुन्हा करताना त्याने वैयक्तिक व टोळीचे वर्चस्व वाढावे व आर्थिक फायदा व्हावा तसेच जनमाणसात दहशत रहावी हाच उद्देश ठेवुन टोळी प्रमुखाने गुन्हे केलेले आसल्याचे पोलीसांच्या तपासातून समोर आलेले आहे.
सदर टोळीमधील सर्व आरोपी यांनी संघटीत गुन्हेगारी टोळी बनवुन हिंसाचाराचा वापर करुन वर्चस्वासाठी व आर्थिक फायदयासाठी संघटीतपणे गुन्हे करीत असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांचे विरुध्द महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ अतंर्गत कारवाई करणे बाबत प्रस्ताव पोलीस आयुक्त कार्यालय येथे सादर केला असता सदर प्रस्तावा मधील कागदपत्रांची छाननी करुन नमूद गुन्हयामध्ये महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ चे कलम ३ (१) (ii), ३ (४) या कलमांचा अंतर्भाव करण्याचे आदेश वसंत परदेशी, अपर पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड यांनी पारीत केलेले आहे.
सदरची उल्लेखनीय कामगिरी विनय कुमार चौबे (पोलीस आयुक्त)
वसंत परदेशी (अपर पोलीस आयुक्त), संदिप डोईफोडे (पोलीस उप-आयुक्त गुन्हे), .डॉ. शिवाजी पवार (पोलीस उप-आयुक्त परि-०३), .बाळासाहेब कोपनर (सहा. पोलीस आयुक्त गुन्हे-१) यांच्या मार्गदर्शनाखाली वपोनि
नितीन गिते (महाळुंगे एमआयडीसी पो.स्टे), पोनि अनिल देवडे (पी.सी.बी गुन्हे शाखा), तसेच अंमलदार सचिन चव्हाण, व्यंकप्पा कारभारी, पी.सी.बी. गुन्हे शाखा, पोहवा कोणकेरी (महाळुंगे एमआयडीसी पो.स्टे) यांच्या पथकाने केली आहे.