लोणी काळभोर – कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाने खोतीदारांना मज्जाव केल्याने तीन तालुक्यातील शेतकऱ्यांचा लाखो रुपयांच्या मालाचे नुकसान होत आहे, रयत शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शिष्ठमंडळांने मांजरी उपबाजारात निवेदन दिले तातडीने यावर निर्णय संचालक मंडळाने घेतला नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी दिला. मांजरी उपबाजारात खोतीदारांना परवानगी देण्याबाबत संचालक मंडळ अनुकूल असताना काही ठरावीक संचालक विरोध करत असल्याने शेतकऱ्यांनी संचालकांचा निषेध व्यक्त केला.
आमच्या रानातील माल काढण्यावाचून पडल्याने आमचे लाखो रुपयांचे नुकसान होण्याचा धोका निर्माण झाला आहे आम्हाला शेतात जनावरे सोडावी लागत आहेत, याबाबत तातडीने संचालक मंडळाने निर्णय घेतला नाही तर आत्महत्या करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी यावेळी बाजार समितीच्या मांजरी बाजार विभाग प्रमुख किरण घुले यांना दिला. रयत शेतकरी संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रामदास कोतवाल यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी मांजरी उपबाजारात शिष्ठमंडळ घेऊन मागण्यांचे निवेदन दिले, यावेळी काही संचालक उपस्थित असताना त्यांनी शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले नाही.
यावेळी रयत शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष रामदास पाटील बुवा कोतवाल, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष हेमंत चौधरी, पुणे जिल्हा उपाध्यक्ष संतोष महाडिक, पुणे जिल्हा अध्यक्ष पोपटराव महाडिक, पुणे जिल्हा सरचिटणीस टिके महाडिक, महिला अध्यक्ष कल्पना गव्हाणे पाटील, संपर्कप्रमुख शिरूर हवेली भानुदास शिंदे, हवेली तालुका उपाध्यक्ष आप्पा घोलप, यांच्यासह शेतकरी माजी सरपंच सचिन तुपे, यशवंत कारखान्याचे माजी संचालक महादेव धुमाळ, मंदार धुमाळ, माऊली माथेफोड, विलास जवळकर, शेखर काळभोर, लालूशेठ चावट, उपसरपंच गोकुळ ताम्हाणे, हनुमंत काळभोर, सूर्यकांत काळभोर, पोपट खेडेकर, विठ्ठल खेडेकर, अमृत काळभोर, नाना रुपनवर, आकाश गव्हाणे, आनंद काळभोर, दशरथ सातव, राजेंद्र खेडेकर, रामदास चौधरी, प्रदीप तावरे, दत्तात्रय काळभोर, बाळू काळभोर, यशवंत कानकाटे यांच्यासह असंख्य शेतकरी उपस्थित होते.
आमच्या कुटूंबात व्यक्ती आजारी आहेत, मजुर मिळत नाही, काही संचालक व्यापारी पाठवितो माल काढायला म्हणतात अन फोन उचलत नाहीत, शेतातील माल काढणे अवघड झाले आहे खोतीदार व्यापारी आम्हाला योग्य मोबदला देऊन वेळेवर माल काढतात प्रशासनाने केवळ एका संचालकाच्या हट्टापायी खोतीदार व्यापाऱ्यांना मांजरी उपबाजारात मज्जाव केल्याने तीन तालुक्यातील शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे तातडीने संचालक मंडळाबरोबर शेतकऱ्यांची मीटिंग घ्यावी व या निर्णयाचा फेरविचार करून खोतीदार व्यापाऱ्यांना परवानगी द्यावी अशी आग्रही मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली.
संचालकाने शेतकऱ्यांमध्ये वाद लावण्याचा केला प्रयत्न..
रयत शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने बाजार समितीत प्रवेश केला यावेळी एक संचालक उपस्थित होते त्यांनी शेतकऱ्यांशी चर्चा केली नाही, कार्यालयातून पळ काढला अन मार्केटमध्ये जाऊन सर्व कामगार, ड्रायव्हर, छोटे शेतकरी गोळा करून कार्यालयासमोर घोषणा देण्यास सांगितले काही काळ येथील वातावरण संतप्त झाले होते परंतु पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे वातावरण निवळे, संचालक सर्व शेतकऱ्यांचे प्रतिनिधी असताना शेतकऱ्यांमध्ये वाद होतील असे का वागत आहेत असा आरोप शेतकरी संदीप काळभोर यांनी आरोप केला आहे
खोतीदारांचे उपोषण तर शेतकऱ्यांचे तीव्र आंदोलन…
संचालक मंडळांनी खोतीदारांना मज्जाव केल्याने खोतीदार संघटनेचे बाळासाहेब भिसे २६ जानेवारी पासून आमरण उपोषण करणारा असून याबाबत त्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले आहे. रयत शेतकरी संघटनेच्या वतीने २८ जानेवारी रोजी मांजरी उपबाजाराच्या प्रवेशद्वारावर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा प्रदेशाध्यक्ष रामदास कोतवाल यांनी दिला आहे.
Post Views: 81