पुणे – आगामी विधानसभा निवडणुक 2024 च्या अनुशंगाने मा.वरिष्ठांचे आदेशाने कायदा व सुव्यवस्था राखणेसाठी गुन्हे प्रतिबंधक कारवाई तसेच बेकायदेशीर हत्यार, अग्निशस्त्र वापरणारे यांचेविरोधात कडक कारवाईचे आदेश झाले असताना दिनांक 07/10/2024 रोजी सदर आदेशाचे अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट 6 येथील बाळासाहेब सकटे, कानिफनाथ कारखेले यांना खात्रीशीर बातमी मिळाली की, एक इसम हा स्वत: चे कब्जात बेकायदेशीरीत्या विनापरवाना अग्निशस्त्र बाळगत आहे.
सदर प्राप्त बातमीची शहानिषा करणेकामी गुन्हे शाखा, युनिट 6 चे प्रभारी पोलीस निरीक्षक वाहिद पठाण, सहा.पोलीस निरीक्षक मदन कांबळे व पथक यांनी वडाची वाडी, उंड्री, पुणे येथुन आरोपी नामे साहिल राजु शेख, वय 24 वर्षे, धंदा व्यवसाय, रा.38 मॅजेस्टिक पार्क, बी बिÏल्डग, फ्लॅट नं. 1206, वडाची वाडी रोड, उंड्री, पुणे यास कौसरबाग, कोंढवा खुर्द, पुणे येथुन ताब्यात घेतले. नमुद इसमास विश्वासात घेवुन सखोल चौकशी करून त्याचे ताब्यातून एक देशी बनावटीचे लोखंडी पिस्टल व दोन जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली आहेत. सदरबाबत कोंढवा पोलीस ठाणे येथे आर्म अॅक्ट कलम 3,25 सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (अ) सह 135 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.
सदर आरोपी हा व्ही.पी.रोड पोलीस ठाणे, मुंबई गु.र.नं.297/2022, कलम 394, 395, 397, 506(2), 120(ब) भा.द.वि. प्रमाणे दाखल गुन्हयात पाहिजे आरोपी असून मा. सर्वोच्च न्यायालयाने त्याचा जामीन नामंजूर केला आहे.
सदरची कामगीरी मा.अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. शैलेश बलकवडे, मा.पोलीस उपआयुक्त (गुन्हे) श्री निखिल पिंगळे, मा. सहा.पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. राजेंद्र मुळीक, गुन्हे शाखा 2 , यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, युनिट -6 चे प्रभारी पोलीस निरीक्षक वाहिद पठाण, सहा.पोलीस निरी. मदन कांबळे,पोलीस उपनिरी. रामकृष्ण दळवी, रमेश मेमाणे, बाळासाहेब सकटे, नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले, ऋषीकेश ताकवणे, सचिन पवार, ऋषीकेश व्यवहारे, गणेश डोंगरे, शेखर काटे, नितीन धाडगे, सुहास तांबेकर, प्रतिक्षा पानसरे व किर्ती मांदळे यांनी केली आहे.