पुणे:- निवडणूक आयोग, भारत सरकार यांचे पत्र क्र.४३७/६/१/ECI/PN/23/2024 DATE 16.03.2024 अन्वये १८ व्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूका घेण्याचा कार्यक्रम जाहीर केलेला असुन दिनांक १६/०३/२०२४ रोजी पासून निवडणूकीचा निकाल जाहीर होईपर्यंत आदर्श आचारसंहीता अस्तित्यात राहील. ३५ बारामती लोकसभा मतदार संघात मतदान दिनांक ०७/०५/२०२४ रोजी होणार आहे.
पुणे पोलीस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्रात ३५ बारामती लोकसभा मतदार संघात (२०२ पुरंदर, २०३ भोर, २११ खडकवासला विधानसभा मतदार संघाचा) समावेश आहे.
निवडणूक आयोग, भारत सरकार यांचेकडील पत्र क्र.४६४/आय.एन.एस.टी./२००७/ पी.एल.एन.-१, दिनांक ०८/०१/२००७ व दिनांक २७/०२/२००७ अन्यये प्रचार संपल्यानंतरच्या वेळेपासून मतदान प्रक्रिया पूर्ण होईपर्यंतच्या कालावधीत राजकीय व्यक्तीवर जर ते त्या मतदार संघाचे मतदार नसतील तर त्या मतदार संघात थांबणे बाबत प्रतिबंध करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.
मतदान प्रक्रिया सुरळीत व शांततेत पार पाडणेसाठी, सार्वजनिक शांततेला व मालमत्तेला धोका पोहचू नये, सार्वजनिक शांतता बिघडू नये यासाठी सर्व राजकीय व्यक्तींना किंवा राजकीय पक्षाशी संबंधीत असलेल्या कोणत्याही व्यक्तींस ते ज्या लोकसभा मतदार संघाचे मतदार नाहीत, त्या लोकसभा मतदार संघात थांबणेस/वास्तव्य करण्यास प्रतिबंध करणे जरूरीचे असल्याने प्रविण पवार, पोलीस सह आयुक्त, पुणे शहर यांनी फौजदारी दंड प्रक्रिया संहिता १९७३ च्या कलम १४४ अन्यये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी पुणे पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात दिनांक ०५/०५/२०२४ चे १८.०० वा. पासून ते दिनांक ०७/०५/२०२४ चे २४.०० वा. पर्यंत खालीलप्रमाणे आदेश देण्यात येत आहे.
१) सर्व राजकीय व्यक्ती किंवा राजकीय पक्षाशी संबंधीत कोणतीही व्यक्ती ते ज्या लोकसभा मतदार संघाचे मतदार नाहीत, त्या मतदार संघात थांबणेस/वास्तव्य करणेस
प्रतिबंध करण्यात येत आहे.
सदर आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती भा.दं.चि. कलम १८८ अन्यये शिक्षेस पात्र राहील. सदरचा आदेश पुणे शहर प्रवीण पवार पोलीस सह आयुक्त, पुणे शहर यांनी दि.०२/०५/२०२४ रोजी दिला आहे.