पुणे – तक्रारदार यांचे पतीचे नावे मु. पो. साबर्डी, ता. खेड, जि. पुणे येथे गट नं. २४५ मध्ये एकूण ६३ गुंठे शेत जमीन असून, सदर गटाची मोजणी करण्याकरीता तक्रारदार यांचे पती यांनी दि. १/१/२०२४ राजी उपअधीक्षक भुमी अभिलेख, नगर भूमापक अधिकारी, ता. खेड, जि. पुणे यांच्याकडे अर्ज दिला होता. खाजगी टायपिस्ट महिला सुनंदा वाजे वय ५५ वर्षे ह्या सध्या नगर भूमापन अधिकारी खेड कार्यालयामध्ये खाजगी टायपिस्ट म्हणून काम करतात.
खाजगी टायपिस्ट महिला सुनंदा वाजे यांनी तक्रारदार यांचेकडे सदर काम करण्यासाठी प्रथम १२,०००/- रुपये म त्यानंतर ऑनलाईन फॉर्म भरण्याकरीता आणखी २,०००/- रुपये लागतील असे सांगितल्यावर, तक्रारदारयांनी सदर रक्कम रोख स्वरुपात दिली. तक्रारदार यांचे पतीचे नावे असलेल्या जमीनीची मोजणी करण्यात आली. त्यानंतर खाजगी महिला सुनंदा वाजे यांनी तक्रारदार यांना फोन करुन, लोकसेवकाने जमीन मोजणी करीता आणलेली मशिनचे आणखी ६,०००/- रुपये व जमीनीचे कागदपत्र तयार करणेकरीता ३,०००/- रुपये असे लोकसेवकाकरीता एकुण ९,०००/- रुपये लाचेची मागणी केल्याची तक्रार तक्रारदार यांनी ला.प्र.वि. येथे दिली होती.
सदर तक्रारीची पडताळणी दिनांक २२/०४/२०२४ – २२/०४/२०२४ रोजी दोन वेळा पंचासमक्ष केली असता, खाजगी टायपिस्ट महिला सुनंदा बाजे यांनी तक्रारदार यांचेकडे पंचासमक्ष वरील कामकाजासाठी लोकसेवकाकरीता तडजोडीअंती ७,०००/- रुपयाची लाच रक्कमेची मागणी करुन, खाजगी टायपिस्ट महिला सुनंदा वाजे यांनी तक्रारदार यांचेकडून रुपये ७,०००/- (सात हजार रुपये) लाच रक्कम पंचासमक्ष स्विकारल्या वर त्याना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांचे विरुद्ध खेड पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, सन १९८८ चे कलम नुसार मु.र.नं. २७७/२०२४ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.ला.प्र.वि. पुणे येथील पोलीस निरीक्षक अतुल भोसले तपास करत आहेत.
सदरची कारवाई मा. पोलीस उप आयुक्त/पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे, ला.प्र.वि. पुणे परिक्षेत्र, मा. अपर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानये, ला.प्र.वि. पुणे यांचे मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली.