पुणे – स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास मराठी माणसांच्या मनामनात रुजवणारे “शिवपुत्र संभाजी” हे महानाट्य दिनांक ९, १० व ११ मार्च रोजी हडपसर येथे मुंढवा रेल्वे पुलाजवळील मैदानात आयोजित करण्यात आले आहे.
लोकप्रिय खासदार डॉ.अमोल कोल्हे हे शिवपुत्र संभाजी महाराजांच्या भूमिकेतून एक अनोखा शौर्यपट आपल्यासमोर उलगडणार आहेत. शौर्याचा, समर्पणाचा, स्वराज्य भक्तीचा हा थरार अनुभवायची सुवर्णसंधी या निमित्ताने तमाम पुणेकरांसाठी उपलब्ध झाली आहे.
पुणेकरांसाठी या महानाट्याचे मोफत आयोजन करण्यात आले असून सर्वांनी स्वराज्याचा जाज्वल्य इतिहास “याची देही, याची डोळा” अनुभवण्यासाठी यावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
भोसरी व अहमदनगर येथे महानाट्यास लाभलेला प्रचंड प्रतिसाद पाहता हडपसर येथेही प्रेक्षकांच्या आसन व्यवस्थेची व पार्किंगची प्रशस्त व्यवस्था करण्यात आली आहे. अशी माहिती नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिली.
मोफत पास खालील पत्त्यावर उपलब्ध..
१ – राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) भवन, डेंगळे पुलाजवळ, शिवाजीनगर
२- श्री. प्रशांत सुदामराव जगताप यांचे जनसंपर्क कार्यालय
जगताप चौक, वानवडी, पुणे -४०