प्रतिनिधी अक्षय दोमाले, पुणे
राजगुरुनगर पुणे – महसुल विभागातील तलाठी दिं – ४ मार्च रोजी राजगुरुनगर तलाठी कार्यालयातील बबन कारभारी लंघे, वय ४६ वर्ष, पद तलाठी, राजगुरुनगर तलाठी कार्यालय, ता. खेड, जि. पुणे (वर्ग-३) यांना लाच स्विकारले प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कडून कारवाई करण्यात आली.
मिळालेल्या माहीती नुसार तक्रारदार व त्यांच्या मित्राची पत्नी असे दोघांनी एकत्रीत भागीदारीमध्ये जमिनीचे एक गुंठा क्षेत्र सामाईक मध्ये खरेदी केले होते.सदर नावाची नोंद, सातबारा उतार्या मध्ये करण्यासाठी राजगुरुनगर तलाठी कार्यालयातील कार्यरत असलेले लोकसेवक तलाठी बबन लंघे यांनी तक्रारदार यांचेकडे १५,०००/- रुपयांची लाचेची मागणी केली होती.त्यामुळे तक्रारदार यांनी लाच लुचपत प्रतिबंध विभाग पुणे कार्यालयास तक्रार दाखल केली होती.
सदर तक्रारीची पडताळणी दिनांक ०२/०२/२०२४, २१/०२/२०२४, ०४/०३/२०२४ पडताळणी पंचा समक्ष केली असता, लोकसेवक बबन लंघे यांनी तक्रारदार यांचेकडे सात-बारा उता-यावर नोंद करुन, उतारा देणे करीता तडजोडीअंती २,०००/- रुपये लाच रक्कमेची मागणी केली होती .दि. ०४/०३/२०२४ रोजी लोकसेवक बबन लंघे यानी तक्रारदार यांचेकडून रक्कम रुपये २,०००/- (दोन हजार रुपये) लाच रक्कम पंचासमक्ष स्विकारल्यावर त्याना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांचेविरुद्ध खेड पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, सन १९८८ चे कलम ७.प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.सदर प्रकरणात पुढील तपास पुणे येथील लाचलूचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक प्रणेता सांगोलकर करीत आहेत.
लाच लुचपत प्रतिबंध पुणे विभागाचे नागरीकांना आवाहन
लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास त्याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे कार्यालयास खालील नमूद क्रमांकवर सपंर्क साधण्याचे आवाहन श्री. अमोल तांबे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. पुणे यांनी केले आहे.
१) हेल्पलाईन टोल फ्री क्रमांक १०६४
२) अॅन्टी करप्शन ब्युरो, पुणे दुरध्वनी क्रमांक ०२० २६१२२१३४, २६१३२८०२, २६०५०४२३
३) व्हॉट्स अॅप क्रमांक पुणे – ७८७५३३३३३३
४) व्हॉट्स अॅप क्रमांक मुंबई – ९९३०९९७७००
५) ई-मेलआयडी पुणे dyspacbpune@mahapolice.gov.in
६) वेबसाईट www.acbmaharashtra.gov.in
७) ऑनलाईन अॅप तक्रार www.acbmaharashtra.net.in