हडपसर :- दिनांक 31/10/2023 रोजी सायंकाळी 05.30 वाजता हडपसर पोलीस स्टेशन मधील दामिनी मार्शल व तुकाई मार्शल यांना कॉल द्वारे माहिती समजली ससाणे नगर येथे दामिनी मार्शल ची आवश्यकता आहे सदर कॉल प्राप्त होताच दामिनी मार्शल व तुकाई मार्शल तत्काळ ससानेनगर गल्ली नंबर 13 येथे गेले असता तेथे चार दिवसाची नवजात बालिका बेवारस स्थितीत मिळून आली. तेथे अधिक चौकशी केली असता गल्ली न 13 परिसरात नमूद दिवसाची बालिका कोणीतरी अज्ञात व्यक्तीने सोडून गेले असल्याचे निष्पन्न झाले.
हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली दामिनी मार्शल महिला पोलीस अंमलदार वैशाली उदमले, राजश्री जाधव ,मंजुषा डेंगळे, उषा सोनकांबळे व तुकाई दर्शन मार्शल पो. शि. पवार यांनी सदर बालीकेला पाहिले असता नवजात मुलीच्या चेहऱ्यावर मांजराच्या नखाच्या ओरखडे असलेल्या अवस्थेत मुलगी त्या ठिकाणी रडत होती. सदर नमूद पथकाने तत्काळ नमूद नवजात बालीकेस ससाणे नगर येथील लहान मुलांचे डॉक्टर सचिन सानप यांच्याकडे घेवून जावून प्रथम प्राथमिक उपचार केला. तसेच सदर ची माहिती तात्काळ स्थानिक समाज सेवक आणि बाल कल्याण समितीस दिली.
नमूद बालिकेला पुढील उपचारा कामी के. एम .हॉस्पिटल पुणे येथे पाठवण्यात आले .तसेच पुढील देखभाली करिता काळजी व संरक्षण कामी बालकल्याण समिती क्रमांक 1 येरवडा पुणे यांचे आदेशाने भारतीय समाजसेवा केंद्र कोरेगाव पार्क पुणे. यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
पोलिस शिपाई पवार यांनी नमूद स्त्री जातीचे अर्भक आई/वडील/पालक यांनी सोडून देण्याच्या उद्देशाने परित्याग केल्याने अज्ञात व्यक्तीनी विरुद्ध सरकार तर्फे फिर्याद दिली असून ठाणे अंमलदार पो उ नि विनोद पवार यांनी भा द वी कलम 317 प्रमाणे अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास स पो नि अब्दागिरे हे करीत आहे.
पुणे महानगरपालिकेतील अनधिकृत बांधकाम विभागातील कनिष्ठ अभियंता,उप अभियंता, कार्यकारी अभियंता मालामाल…
अनधिकृत इमारतीच्या बांधकामाकडे हेतुपुरस्सरपणे दुर्लक्ष करून बांधकाम पूर्ण करण्यास पुरेसा वेळ देणार्या अधिकाऱ्यांच्या मालमत्तेची चौकशी होणार का? प्रतिनिधी...