लोणी काळभोर:- पुणे शहर पोलिस कायमच काही विषयांमुळे चर्चेत असतात पुणे शहर पोलिस कायम सर्वात चर्चेत असलेले पोलिस ही बोलले जाते.आज चर्चेत आलेले नाव ते म्हणजे पुणे शहर पोलिस दलातील लोणी काळभोर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण.
दत्तात्रय चव्हाण आज पोलिस सेवेतून सेवानिवृत्त होत आहेत हे कळताच नागरिकांची चव्हाण यांना भेटण्यासाठी मोठ्याप्रमाणावर गर्दी जमली नागरिकांनी दत्तात्रय चव्हाण यांना सेवेतून आत्ताच निवृत्त होऊ नये म्हणून आग्रही धरला.लोणी काळभोर वरिष्ठ पोलिस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण हे कायम सर्व नागरिकांशी मन मिळून राहत होते ,दत्तात्रय चव्हाण हे कायम सर्व सामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी तत्पर राहून सामान्य जनतेला पोलिस खात्याच्या माध्यमातून न्याय मिळवून देत असत. मोठ्या प्रमाणावर दत्तात्रय चव्हाण यांच्या चांगल्या कार्याचे कौतुक सर्व समस्त ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले कार्यक्रमाच्या वेळी दिप प्रजवलन करण्यात आले सर्वांनी आपल्या दत्तात्रय चव्हाण यांच्या मैत्रीच्या आठवणीना उजाळा दिला,या प्रसंगी दत्तात्रय चव्हाण हे जुन्या आठवणी ऐकून भावनिक झाले येणाऱ्या काळात दत्तात्रय चव्हाण यांना सर्वांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या त्यांनी त्यांच्या ३६ वर्षाच्या पोलिस सेवेत मोठ्याप्रमाणावर जनतेचे प्रेम मिळवले.
कार्यक्रम प्रसंगी उपस्थित ,अप्पर पोलिस आयुक्त ,रंजन कुमार शर्मा, पोलीस उप आयुक्त विक्रांत देशमुख,सहाय्यक पोलीस आयुक्त अश्विनी राख, पोलिस निरीक्षक सुभाष काळे, सर्व पोलिस अधिकारी ,राजकीय नेते, पुणे जिल्हा, पिंपरी चिंचवड,ठाणे, व लोणी काळभोर व हवेली तालुक्यातील समस्त ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते व सर्वांनी पोलिस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण यांना सेवा निवृत्ती नंतरच्या भावी वाटचालीस व आरोग्य संपन्न जीवन जगण्याच्या शुभेच्छा दिल्या.