प्रतिनिधी(पुणे) – दिं – १४ नोव्हेंबर – लष्कर पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर २५७/२०२४, भा. न्या. सं. २०२३ चे कलम ३०५, ३(५) मधील फिर्यादी यांनी नेहमीप्रमाणे दि ३१/१०/२०२४ रोजी कॅम्प, पुणे येथील दागिना नावाचे दुकान उघडून दुकानाचे मालक व त्यांचे कामगार दुकानात हजर असताना एक महिला व पुरुष त्यांच्या दुकानामध्ये खरेदी करण्याकरिता आले होते.
त्यावेळी अन्य कस्टमर देखिल खरेदी करता आलेले होते. सदर महिला व तिच्या सोबत असलेला पुरुष यांनी फिर्यादी यांना कानातील टॉप्स घ्यायचे आहेत असे सांगुन टॉप्स दाखविण्यास सांगितले. फिर्यादी यांचे दुकानातील सेल्समन हे त्यांना कानातील टॉप्स ट्रे मधुन काढुन दाखवित होते. त्यावेळी त्यांनी हातचलाखी करुन सेल्समनची नजर चुकवुन २ टॉप्स स्वताच्या हातामधे ठेवले. त्याचवेळी तिच्या बरोबर असलेल्या इसमाने एक टॉप्स हातात घेवुन मोबाईल खिशामधे ठेवण्याचा बहाना करुन १ टॉप्स खिशामधे ठेवला. सदर महिला व पुरुष दुकानातुन निघुन गेल्यानंतर फिर्यादी व सेल्समन यांनी दुकानातील ट्रे मधिल टॉप्स तपासुन पाहिले असता ३ टॉप्स त्यामध्ये मिळुन आले नाही. त्यांनी दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासुन पाहिले असता त्यामधे सदर महिला व पुरुष यांनी कानातील टॉप्स चोरी केल्याचे निदर्शनास आले, तेव्हा त्यांची खात्री झाली कि, दुकानात खरेदी करण्याकरिता आलेल्या महिला व तिचेसोबत असलेल्या पुरुषाने हातचलाखी करुन अंदाजे ९५,०००/- रूपये किंमतीचे ३ जोडी सोन्याचे टॉप्स चोरुन नेले आहेत, म्हणुन फिर्यादी यांनी लष्कर पोलीस स्टेशन येथे तक्रार दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुकानातील सी सी टि व्ही फुटेजचे बारकाईने पाहणी केली असता, यातील संशयीत इसम व माहिला हे दुचाकीने येताना दिसत असल्याचे स्पष्ट निदर्शनास आले. त्याप्रमाणे सदर दुचाकी वरील इसम व महिला हे कोठुन आले याबाबत आजुबाजुचे सी सी टि व्ही फुटेजची पाहणी केली असता, दाखल गुन्ह्यातील महिला आरोपी हि केशवनगर पो. चौकीजवळ, केशवनगर, मुंढवा, पुणे. येथे रहात आल्याचे निष्पन्न झाले. महिला आरोपीच्या राहते घरी, गुन्ह्यातील पुरूष आरोपी आल्याचे दिसुन येताच, सदर महिला आरोपी व पुरुष आरोपीच्या घरी अचानक पणे छापा घालुन महिला आरोपी व पुरुष आरोपीस यांना ताब्यात घेण्यात आले व लष्कर पोलीस स्टेशन येथे आणुन त्यांना त्यांचे नाव पत्ता विचारला असता, पुरुष आरोपीने त्याचे नाव १) शेखर हेमराज वानी, वय ३२ वर्ष, रा. चारवाडा गणपती मंदिराजवळ, शिवाजी पुतळा, मांजरी, हडपसर, पुणे २) शिवानी दिलीप साळुंखे, वय २४ वर्ष, रा. केशवनगर पो. चौकीजवळ, केशवनगर, मुंढवा, पुणे, मुळ रा. आंबेडकर चौक, अकलुज, ता. माळशिरस, जि. सोलापुर असे असल्याचे सांगितले, सदर आरोपींनी गुन्हा केल्याची कबुली दिली असुन त्यांना दाखल गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.
आरोपीकडे पोलीस कस्टडी दरम्यान तपास केला असता दोघांनी मिळुन यापुर्वी पुणे शहरात ०२, मुंबई शहरात ०१, सिंधुदुर्ग जिल्ह्यात ०१, सातारा जिल्ह्यात ०१, पिंपरी चिंचवड शहरात ०२, ठाणे शहरात ०१, अशा वेगवेगळ्या ठिकाणी एकुण ०९ गुन्हे केल्याचे तपासात निष्पन झाले असुन, पुणे शहर आयुक्तालयाचे कार्यक्षेत्रात सिंहगड रोड पोलीस स्टेशन येथील गुन्हा रजि. क्र. ३३८/२०२४, भा. द. वि. कलम ३८०, ३४ प्रमाणे गुन्हा उघडकीस आला आहे.
सदरची कामगीरी ही मा. अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे श्री. प्रविणकुमार पाटील, मा. पोलीस उप आयुक्त परि.-२, पुणे श्रीमती स्मार्तना पाटील, मा. सहा. पोलीस आयुक्त लष्कर विभाग, पुणे श्री. दिपक निकम, यांचे मार्गदर्शनाखाली लष्कर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री गिरिषकुमार दिघावकर, पोलीस निरिक्षक (गुन्हे) श्री. प्रदिप पवार, सहा. पोलीस निरिक्षक विशाल दांडगे, यांचे नेतृत्वाखाली, तपास पथकातील पोलीस अंमलदार महेश कदम, संदिप उकिर्डे, सोमनाथ बनसोडे, रमेश चौधर, सचिन मांजरे, लोकेश कदम, हराळ, कोडिलकर, महिला पोलीस अंमलदार अल्का ब्राम्हणे, यांनी केली आहे.