थेऊर :- यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी दोन्ही पॅनेलचे ४२ उमेदवार वगळता अजून १२ उमेदवार रिंगणात असून त्यांनी आपल्याच पॅनेलला पाठिंबा द्यावा यासाठी दोन्ही पॅनेलच्या वतीने जोरदार प्रयत्न सुरू आहेत.
प्रचारामध्ये दोन्ही पॅनेलचे उमेदवार एकमेकांवर जोरदार टीका चालू आहे यशवंत सहकारी साखर कारखाण्याचे निवडणुकीत सभासदांचा आण्णासाहेब मगर रयत विकास पॅनेल ला सभासदांचा वाढता कल असल्याने आण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडी पॅनेलचा पराभव मोठ्या फरकाने होईल अशी दबक्या आवाजात कुजबुज यशवंत सहकारी साखर कारखाण्याच्या सभासदांमध्ये रंगताना दिसत आहे.
आण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडी च्या उमेदवारांचा पराभव दिसत असल्याने आण्णासाहेब मगर रयत सहकारी पॅनेलच्या उमेदवारांवर अघोरी विद्येचा प्रकार चालू झाल्याची नागरिकांमध्ये दबक्या आवाजात चर्चा होताना दिसत आहे .
थेऊर ग्रामपंचायतचे माजी सरपंच व आण्णासाहेब मगर रयत सहकारी पॅनेलचे सर्वात चर्चेत असणारे उमेदवार नवनाथ काकडे यांचा येणाऱ्या यशवंत सहकारी साखर कारखाना निवडणूकीत पराभव होण्यासाठी चक्क अघोरी विद्या केल्याचा प्रकार घडल्याने हवेली तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.