पुणे – दि 08/04/24 रोजी गुन्हे शाखा युनिट ६ कडील अधिकारी व अंमलदार असे युनिट हद्दीत सार्वत्रिक लोकसभा निवडणूक 2024 आचारसंहिता चे अनुषंगाने हद्दीमध्ये पेट्रोलिंग करत असताना पो अंम 2688 ऋषीकेश व्यवहारे यांना पेरणे गावचे हद्दीत मौलाई चौक, डोंगरगाव रोड, पेरणे येथे एक महिला गावठी दारूची भट्टी लावून दारू तयार करत आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने सदर ठिकाणी युनिट स्स्टाफ व लोणीकंद डी बी पथकासह धाड टाकून महिला नामे नीलम बजरंग परदेशी,वय 30 वर्षे रा सदर ही बेकायदेशीपणे हातभट्टी लावून हातभट्टी लावण्यासाठी लागणारे कच्चे रसायन ( तुरटी, नवसागर, गूळ मिश्रित ) व इतर साहित्यासह रु असा एकूण 81,000/- च्या मुद्देमालासह गावठी दारू तयार करताना मिळून आली म्हणून सदर हातभट्टी खाजगी JCB च्या साह्याने उध्वस्त करून नमूद महिले विरुद्ध कलम लोणीकंद पोलीस स्टेशन गु र नं- 346/2024 महा दारूबंदी कायदा कलम 65 (फ) (ब) (क) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त श्री. अमितेश कुमार सर , मा. सह पोलीस आयुक्त श्री. प्रवीण पवार सर , मा.अपर पोलीस आयुक्त गुन्हे श्री. शैलेश बलकवडे सर , मा.पोलीस उपायुक्त गुन्हे श्री. अमोल झेंडे सर, मा.सहा पोलीस आयुक्त गुन्हे श्री.सतीश गोवेकर सर यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 6 पोनि उल्हास कदम, रमेश मेमाने, संभाजी सकटे, ऋषीकेश व्यवहारे, ऋषीकेश ताकवणे, सचिन पवार, शेखर काटे, ज्योती काळे, नितीन धाडगे तसेच लोणीकंद तपास पथकातील सहा पो निरीक्षक रवींद्र गोडसे, पोहवा तीकोणे, पोना जगताप, अमोल ढोने, मल्हारी सापुरे, साईनाथ रोकडे, जॉन तुपारे, दत्ता गावडे यांनी केलेली आहे.