पुणे :- पूर्व हवेली हा खूप प्रगतशील भाग म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी दिवसेंदिवस बांधकाम क्षेत्र वाढत चालले असल्यामुळे या ठिकाणी बांधकाम करण्यासाठी महत्वाचा विषय असतो तो म्हणजे वाळू व मुरूम याचे अनेक ठिकाणी शेतजमिनी मधून उत्खनन केले जाते.
“जप्त केलेली वाहने दंड आकारून सोडण्याचा अधिकार प्रांत अधिकारी यांनाच.”
बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो अनधिकृत पध्द्तीने मोठ्या प्रमाणात शेत जमिनीत गौण खनिज उत्खनन केले जाते ,मोठ्या प्रमाणावर संबधित अनधिकृत गौण खनिज उत्खनन करण्यावर कारवाई होते.पण सदर अनधिकृत गौण खनिज उत्खनन करून वाहतुकीसाठी वापरलेले जाणारे साहित्य व साधन सामग्री इत्यादी जप्त करण्याचा अधिकार तहसीलदार यांना आहे तथापि, अशी जप्त केलेली वाहने यांना दंड आकारून सोडण्याचा अधिकार प्रांत अधिकारी यांना आहे.
“वाहनाच्या जप्तीच्या पंचनाम्या वर ही तलाठी, मंडल अधिकारी, नायब तहसिलदार यांची स्वाक्षरी चालणार नाही”
सदर वाहनाच्या जप्तीच्या पंचनाम्या वर ही तलाठी, मंडल अधिकारी, नायब तहसिलदार यांची स्वाक्षरी चालणार नाही. त्यावर तहसिलदारांनी च स्वाक्षरी करावी. तहसीलदार यांनी अठ्ठेचाळीस (४८) तासात सदर पंचनामा, दंडाचा आदेश सविस्तर अहवाला सह पुढील कार्यवाही साठी प्रांत अधिकारी यांचेकडे सादर करणे आवश्यक असते.
“दंडाची रक्कम ठरवण्याचा अधिकार प्रांत अधिकारी यांनाच.”
अनधिकृत गौण खनिज उत्खनन प्रकरणी झालेल्या कारवाईत जप्त केलेले सदर साहित्य किंवा वाहन, प्रांत अधिकारी ठरवतील त्या रकमेचे बंधपत्र आणि योग्य ते शपथपत्र संबंधितांकडून करून दिल्यानंतर सदर वाहन मुक्त करता येईल.संबंधिताने बंधपत्राचे पालन न केल्यास, बंधपत्रात नमुद रक्कम संबंधिताकडून वसूल करण्याची कारवाई करता येईल.