
पुणे- दिनांक ०४/०७/२०२६ रोजी रात्री २२/०० ते दि. ०५/०७/२०२६ रोजी सकाळी ०७/३० वाजताचे दरम्यान “एस.एस. मोबाईल शॉपी, भाजी मंडई उरुळी देवाची ता. हवेली, जि. पुणे” येथे कोणीतरी अज्ञात चोरट्याने शॉपचा लोखंडी शटर कशाचे तरी सहाय्याने उचकटुन त्यावाटे आत प्रवेश करून १४ मॉबाईल फोन, ११ एअर बड़स, ०३ मोबाईल वॉच, ०५ पावर बैंक तसेच दुरुस्तीसाठी आलेले वेगवेगळया कंपनीचे मोवाईल फोन असे एकुण ६२,७४५/- रुपये किमतीच्या वस्तु चोरी करुन नेले असल्याबाबत फिर्यादी यांनी दिलेले तक्रारीरुन फुरसुंगी पो.स्टे. येथे गु.र.नं. २८२/२०२६, भा. न्याय संहिता सन २०२३ चे कलम ३०५. ३३१ (३),३३१ (४) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर दाखल गुन्हयाची गांभीर्याने दखल घेवुन मा. वरीष्ठांचे आदेशान्वये तपास पथकातील बापुसाहेव खंदारे, विनोद पवार, पोलीस उप-निरीक्षक, सहा. पोलीस फौजदार हरि कदम, पोलीस हवालदार ७४९४ काळे, पोलीस अंमलदार २३ कोरडे, पोलीस अंमलदार १२७२ हराळे हे तपास करीत असताना त्यांनी परिसरातील विविध दुकानातील, रस्त्यावरील व अन्या मागे तपासले सीसीटीव्हि फुटेज, तांत्रिक विश्लेषन व गुप्त खबऱ्याकडे तपासान्वये पथक पाहीजे आरोपीचे मागावर उरुळी देवाची गाव ता. हवेली जि. पुणे या ठिकाणी आले असता पोलीस अंमलदार २३ कोरडे, पोलीस अंमलदार १२७२ हराळे यांना त्याचे गोपणीय बातमीदारामार्फत माहीती मिळाली की, उरुळी देवाची येथील स्मशानभुमी लगत निर्जन ठिकाणी पाठीवर काळया रंगाची बॅग लटवलेले दोन इसम संशयीतरित्या थांबलेले असुन त्यांचे वर्तनस संशयास्पद आहे.
त्याबाबत माहीती प्राप्त झालेने सदरची माहीती त्यांनी तात्काळ विनोद पवार पोलीस उपनिरीक्षक यांना सांगीतले असता त्यांनी लागलीच खबरीची खात्री करण्यासाठी सदरची माहीती वरीष्ठ पोलीस निरीक्षक साो, यांना कळविली. त्यावर त्यांनी पथकास खबरीची खात्री करुन कार्यवाही करण्याचे मुखजल आदेश दिले. आदेश प्राप्त होताच वरील सर्व पोलीस पथक गुप्ततेची खबरदारी घेवुन स्मशानभुमी उरुळी देवाची या ठिकाणी आले असता दोन संशयीत इसम त्याचेजवळील बॅगेसह सदर ठिकाणी थांबल्याचे दिसले. त्यांना वेडा घालुन शिताफीने ताब्यात घेत असताना नमुद इसमांना पोलीस पथकाची चाहुल लागताच ते पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना त्यांना कसोशीने ताब्यात घेण्यात आले.
त्यानंतर सदर संशयीत इसमांना त्यांचे नाव पत्ता विचारुन पळून जाण्याचे कारण विचारले असता ते उडवाउडवीची उत्तरे देवु लागल्याने पोलीस पथकाचा संशय अधिक बळावला. त्यामुळे लागलीच त्यांची अंगझडती व त्याच्या जवळील बॅगेची तपासणी करीता त्यांच्या जवळ बॅगेमध्ये १४ मॉबाईल फोन, ११ एअर बड्स, ०३ मोबाईल वॉच, ०५ पावर बैंक तसेच अन्य मोबाईल फोन अशा चिजवस्तु मिळुन आल्याने त्यांना त्याबाबत विचारणा केली असता त्यांनी दिनांक ०५/०७/२०२६ रोजीचे पहाटे एस. एस. मोबाईल शॉपी उरुळी देवाची गाव ता. हवेली जि. पुणे येथील दुकानाचे लोखंडी शर्टर उचकटुन चोरी केल्याची कबुली दिली. त्यानंतर अधिक तपास करीता मुद्देमालासह इसम हे विधीसंर्घर्षित बालक असल्याचे निष्पन्न झाले आहेत. नमुद विधीसंर्घर्षित बलकाचा अभिलेख पहाता यापुर्वी देखील अशा प्रकारे अपराध केले असल्याचे दिसुन आले आहे. नमुद विधीसंर्घर्षित बालकांकडे मिळुन आलेला मुद्देमाल हा फुरसुंगी पोलीस ठाणे गु.र.नं. २८२/२०२६, भा. न्याय संहिता सन २०२३ चे कलम ३०५, ३३१ (३),३३१(४) अन्वये दाखल गुन्हयातीलच असल्याबाबत खात्रीशीरपणे निष्पन्न झाले आहे. सदरील गुन्हा हा दाखल होताच तात्काळ उघडकीस आणुन १०० टक्के मुद्देमाल हस्तगत करण्यास तपास पथकास यश आले आहे.
सदरची कामगिरी मा. जीवन बेनिवाल, (भा.पो.से) पोलीस उपआयुक्त परि ६, पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली मा. अनुराधा उदमले मॅडम, सहा. पोलीस आयुक्त, लोणीकाळभोर विभाग पुणे शहर, मा. अमोल मोरे, वरिष्ठ पोलीस निरिक्षक, फुरसुंगी पोलीस स्टेशन, पुणे शहर यांचे सुचनेप्रमाणे राजेश खांडे पोलीस निरीक्षक (गुन्हे), तपास पथकातील विनोद पवार, बापुसाहेब खंदारे, पोलीस उप निरीक्षक, सहा. पोलीस फौजदरार हरि कदम, पोलीस हवालदार सतिश काळे, सुनिल कांबळे, वैभव भोसले, बिभिषन कुंटेवाड, पोलीस अमलदार प्रसाद कोरडे, विशाल हराळे, सचिन गावडे, योगेश गायकवाड, नितीन सोनवणे, विनायक पोमण, गणेश शिंदे सर्व नेमणुक फुरसुंगी पोलीस स्टेशन, पुणे शहर यांनी प्रशंसनीय कामगिरी केली आहे.वरील गुन्हयाचा अधिक तपास सहा. पो. फौजदार हरि कदम, फुरसुंगी पोलीस स्टेशन हे करत आहेत.