चंदननगर(पुणे)- दिनांक १३/०६/२०२६ रोजी सकाळी ०७८४५ वा. सुमा. कृष्णाई बंगलो, साईनाथ हौसींग सोसायटी, स.नं. ४२, वडगावशेरी, पुणे येथे यातील फिर्यादी यांनी त्यांचे वयोवृद्ध आई वडीलांची देखभाल करण्यासाठी कामावर ठेवलेली महिला हिने फिर्यादी यांच्या आईच्या अंदाजे ४ तोळे वजनाच्या सोन्याच्या पाटल्या व ५ ग्रॅम वजनाची सोन्याची कर्णफुले असा एकुण २,७०,००००/- रु. किं.चा माल लबाडीच्या इराद्याने चोरी करुन नेला म्हणुन यातील फिर्यादी यांनी दिनांक २८/०६/२०२६ रोजी चंदननगर पोलीस स्टेशन येथे तक्रार दिलेवरुन चंदननगर पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. २९४/२०२६ भा. न्या. सं. कलम ३०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
यातील आरोपी महिलेचे संपुर्ण नाव, पत्ता उपलब्ध नसल्याने सदरचे गुन्ह्याचे तांत्रीक विश्लेषन करुन चंदननगर पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी यातील महिला आरोपी स्वाती विजय मोरे वय ३७ वर्षे रा. फ्लॅट नं.९१२, ९ वा. मजला, लोढा क्राऊन व्हीवा, माजीवाडा, ठाणे (पश्चिम) हीची संपुर्ण माहीती प्राप्त करुन तीला दिनांक ०२/०७/२०२६ रोजी कापुरबावडी पोलीस स्टेशन, ठाणे शहर येथे ताब्यात घेऊन तीचेकडे दाखल गुन्ह्याबाबत सखोल तपास करुन तीने सदरचे गुन्ह्यामध्ये चोरलेले २,४०,०००/-रु. किं. चे ३८.२०० ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या एकूण ०२ बांगड्या व ३०,०००/-रु. किं. चे ५.२०० ग्रॅम वजनाची सोन्याची २ कर्णफुले असा एकुण २,७०,०००/- रु. किं. चा मुद्देमाल हस्तगत करुन सदरचा गुन्हा उघडकीस आणला आहे. दाखल गुन्ह्याचा पुढील तपास सहा. पोलीस निरीक्षक गणेश जगदाळे, चंदननगर पोलीस स्टेशन हे करीत आहेत.
सदरची कामगिरी मा.अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उपआयुक्त, परिमंडळ-०७, पुणे शहर श्री. अबिनाश कुमार, मा. सहा. पोलीस आयुक्त, खराडी विभाग, पुणे शहर श्री. सुनिल दोरगे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक, चंदननगर पोलीस स्टेशन श्रीमती अश्विनी जगताप, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. अमोल धस यांचे संचनांप्रमाणे सहा. पोलीस निरीक्षक गणेश जगदाळे, तपास पथकाचे पोलीस अंमलदार मेमाणे, घावटे, घुटे, लहाणे, पाटील, बेंद्रे, गायकवाड व महिला पोलीस अंमलदार बायसकर यांनी केली आहे.

